British Teen Earns 16 Lakh A Month: सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना कमाई करण्याची संधी मिळाली आहे. मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळ्यांना रोजगार मिळत आहे. सोशल मीडियाचा जेवढा विस्तार होत आहे, तेवढ्या कमाईच्या संधी वाढत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एक १७ वर्षाच्या मुलगा सोशल मीडियाद्वारे एका महिन्याला १९ हजार डॉलर म्हणजेच १६ लाख रूपये कमावत आहे. चला जाणून घेऊ तो असं काय करतो.
काय करतो मुलगा?
न्यूयॉर्क पोस्टनुसार, १७ वर्षीय कॅलीन मॅक्डोनाल्ड ऑनलाईन स्टीकरचा बिझनेस करतो. त्याच्या आईने त्याला एक क्राफ्ट किट गिफ्ट दिली होती. या मुलाच्या ४९ वर्षीय आईने दोन वर्षाआधी ख्रिसमसला एक १९१.३७ डॉलरची सर्किट जॉय (डिजिटल ड्रॉईंग, कंटिंग आणि प्रिटिंग मशीन) दिली होती. यानंतर कॅलीनने या मशीनचा योग्य वापर करून पैसे कमावणं सुरू केलं. कॅलीन यातून प्रिटिंग ट्रान्सफर करणं सुरू केलं, जे ग्लासवेअरवर चिटकवले जातात. जेव्हा त्याने त्याचं काम फेसबुकवर शेअर केलं तर त्याला पैसे मिळू लागले होते. या वर्षाच्या सुरूवातीला त्याने २०० पेक्षा जास्त आयटम सेल केले. महत्वाची बाब म्हणजे आधी तो हे काम शाळेतून घरी आल्यावर करत होता.
मात्र, नंतर कामाचं प्रेशर वाढल्याने आणि कमाई सुद्धा चांगली होत असल्याने कॅलीनने जुलै २०२४ मध्ये शाळा सोडली. त्यानंतर त्याने एक मोठी प्रिटिंग मशीन खरेदी केली आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टीकर विकले. आता कॅलीन सोशल मीडियावरून स्टीकर विकून लाखो रूपयांची कमाई करत आहे. कॅलीन म्हणाला की, 'मला माझ्या आईने ख्रिसमसला दिलेलं हे शानदार गिफ्ट आहे. मला नव्हतं माहीत की, असंही काही होईल. आता मी इतका बिझी आहे की, माझ्याकडे वेळच नाही'.