सापाला जगातील सगळ्यात विषारी जीव मानलं जातं. पण प्रश्न हा आहे की, सापांची अंडी कोंबडीच्या अंडींसारखी खाल्ली जाऊ शकतात का? कारण साप एक विषारी जीव आहे. त्यामुळे त्याचं अंडही विषारी अससेल. पण खरंच असं असतं का? यासंबंधी आज जाणून घेऊ...
साप अंडी देतो. पण सापाची अंडी दुकानांमध्ये विकली जात नाहीत. तर कोंबड्यांची अंडी दुकानावर विकली जातात. पण जसे आपण कोंबडींची अंडी खातो तशी सापांची अंडीही खाऊ शकतो का? अशात ही अंडी खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो?
अनेक देशांमध्ये खातात सापांची अंडी
वाइल्डलाईफ इन्फॉर्मर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सापांची अंडी खाल्ली जाऊ शकतात. पण त्यासाठी ही अंडी व्यवस्थित उकडण्याची गरज असते. कोंबडीच्या अंड्यासारखंच सापांच्या अंड्यांमध्येही भरपूर प्रोटीन असतं. तसेच ही अंडी पौष्टिकही असतात. सापांची अंडी विषारी नसतात. जर तुम्ही सापांची अंडी व्यवस्थित उकडली नाही तर पोट दुखू शकतं किंवा इतर समस्या होऊ शकतात. अनेक देशांमध्ये सापांची अंडी खाल्ली जातात. व्हिएतनाम, थाइलॅंड, इंडोनेशिया, चीन, जपान सारख्या काही देशांमध्ये सापांची अंडी खाल्ली जातात.
सापांचं रक्त
जगभरातील अनेक देशांमध्ये सापांचं रक्तही पिलं जातं. यासाठी त्या देशांमध्ये साप पाळले जातात. नंतर सापांना मारून त्यांचं रक्त बाजारात विकलं जातं. इतकंच नाही तर सापांना मारून त्यांच्या वेगवेगळ्या डिशही बनवल्या जातात. ज्या फार महाग असतात. खासकरून थाइलॅंड, इंडोनेशिया आणि चीन सापांची अंडी आणि सापांचं मांस खाण्याची परंपरा आहे.