गटाराच्या पाण्यापासून गॅसच नाही तर आता बियर आली; कमी काळात लोकप्रियही झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:35 AM2019-11-27T11:35:20+5:302019-11-27T11:36:16+5:30
खरे तर गटारीचे पाणी पिण्याची इच्छाही होणार नाही. पण जर बिअर पित असतानाच कळले की ही बिअर गटारीच्या पाण्यापासून बनविण्यात आली आहे तर काय होईल.
स्टॉकहोम : काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये गटारीच्या पाण्यामध्ये पाईप टाकून त्या गॅसवर चहा बनविणाऱ्याची स्तुती केली होती. यावरून मोदी ट्रोल होताच या टपरीवाल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. आता स्वीडनमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. कारण तिथे गटारीच्या पाण्यापासून चक्क बिअर बनविण्यात आली आहे.
खरे तर गटारीचे पाणी पिण्याची इच्छाही होणार नाही. पण जर बिअर पित असतानाच कळले की ही बिअर गटारीच्या पाण्यापासून बनविण्यात आली आहे तर काय होईल. खरेच अशी बिअर स्वीडनमध्ये बनविण्यात आली आहे. आयव्हीएल स्वीडिश एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्सि्टीट्युटने कार्ल्सबर्ग आणि न्यू कार्नेगी ब्रेवरी सोबत मिळून हा प्रयोग केला आहे.
सामान्य नागरिकांमध्ये रिसायकल केलेले पाणी पिण्यावरून वेगवेगळे भ्रम असतात. त्यांच्या डोक्यातून हे भ्रम काढून टाकण्यासाठी ही बिअर बनविण्यात आली आहे. PU:REST नावाची ही बिअर स्वीडनमध्ये लोकप्रियही होत आहे. यंदा मे मध्येच ही बिअर बाजारात आणण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत 6000 लीटर बिअरची विक्री झाली आहे.
आयव्हीएलच्या रुपाली देशमुख यांनी सांगितले की, रिसायकल पाणी स्वच्छ असते आणि आम्ही त्यामध्ये मीठ टाकतो. रिसायकल पाण्याबाबतचे भ्रम ही मानसिक समस्या आहे. यामुळे हे पाणी पिण्यासाठी नाक मुरडले जाते. आमची इन्स्टीट्यूट दारू विकण्याचे काम करत नाही. हा प्रयोग केवळ रिसायकल पाण्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी करण्यात आला आहे.