बॉस असावा तर असा! 'या' IT कंपनीने कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिल्या 50 नवीन कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 02:27 PM2024-01-06T14:27:16+5:302024-01-06T14:37:31+5:30
बहुतांश कर्मचाऱ्यांकडे कार नव्हती आणि कंपनीने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे.
एका IT कंपनीने फेस्टिव्ह सीझनमध्ये आपल्या 50 कर्मचाऱ्यांना नवीन कार भेट दिल्या आहेत. अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशी अनेक उदाहरणं वेळोवेळी पाहायला मिळाली आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या निष्ठावान कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातील बहुतांश कर्मचाऱ्यांकडे कार नव्हती आणि कंपनीने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या मुरली यांनी 2009 मध्ये पत्नीसह Ideas2IT Technology Service Private Limited नावाची IT कंपनी स्थापन केली होती.
कंपनी सुरू झाल्यानंतर असे अनेक प्रसंग आले की त्यात खूप चढ-उतार आले, पण या कर्मचाऱ्यांनी पूर्ण निष्ठेने कंपनीला सर्वतोपरी साथ दिली आणि आज जेव्हा कंपनीची स्थिती चांगली आहे, तेव्हा त्यांनीही काळजी घेतली. कर्मचार्यांना बक्षीस दिलं. नवीन कार भेट म्हणून दिल्या. चेन्नई प्रेस न्यूजने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये एका आयटी कंपनीचे मालक आणि त्याची पत्नी कर्मचाऱ्यांना नवीन कारच्या चाव्या देत आहेत.
IT कंपनीने आपल्या कर्मचार्यांना भेट दिलेल्या गाड्यांमध्ये मारुती सुझुकी एरिनाची स्विफ्ट, ब्रेझा आणि एर्टिगा तसेच मारुती सुझुकी नेक्साच्या इग्निस, बलेनो, फ्रँक्स आणि ग्रँड विटारा यांचा समावेश आहे. मुरली यांनी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना जवळपास 100 कार गिफ्ट केल्या आहेत. मी आणि माझ्या पत्नीकडे कंपनीचे सर्व शेअर्स आहेत आणि आम्ही आमच्या दीर्घकालीन कर्मचाऱ्यांना 33% शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. संपत्ती वाटप कार्यक्रमांतर्गत आम्ही यावर्षी आमच्या 50 कर्मचाऱ्यांना नवीन कार भेट दिल्याचं सांगितलं.