चेन्नईच्या कुंद्राथुरमध्ये एका पती-पत्नीने हॉस्पिटलमध्ये न जाता घरीच आपल्या बाळाला जन्म दिला. 36 वर्षीय मनोहर आणि पत्नी सुकन्याने एक्सपर्टच्या मदतीशिवाय डिलेव्हरी केली. ते ‘होम बर्थ एक्सपीरिअन्स’ नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य होते. ज्यावर डिलेव्हरी करण्याची माहिती आणि सल्ले देण्यात आले होते.
सुकन्या आणि मनोहर व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य होते. ज्यात १ हजारांपेक्षा जास्त लोक सदस्य आहेत. या ग्रुपमध्ये घरीच डिलेव्हरीसंबंधी अनुभव आणि सल्ले नियमितपणे दिले जात होते. सुकन्याने याच ग्रुपवर मिळालेल्या माहितीच्या आधारावर डिलेव्हरी करण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा या भागातील सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी मनोहरची चौकशी केली. यावेळी या व्हॉट्सअॅप ग्रुपबाबतची माहिती समोर आली.
सुकन्या आणि मनोहरला आधी दोन मुली आहेत. त्यांचं वय आठ आणि चार वर्षे आहे. जेव्हा सुकन्या तिसऱ्यांदा गर्भवती झाली, तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची टेस्ट न करण्याचा आणि उपचार न घेण्याचा निर्णय घेतला. १७ नोव्हेंबरला सुकन्याला कळा सुरू झाल्या आणि त्यानी व्हॉट्सअॅप ग्रुपवरील सल्ल्यानुसार घरीच डिलेव्हरी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर एक्सपर्ट्सनी मनोहर यांना या ऑनलाइन माहितीच्या धोक्यांबाबत त्यांना इशारा दिला. आता आरोग्य अधिकाऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली की, सुकन्या आणि तिचं बाळ सुखरूप रहावं.