तुमच्या लहागन्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमची छोटी खेळता खेळता कुठेही जातात. पार्कमध्ये फिरायला गेल्यावर किंवा सहलीला या छोट्या दोस्तांवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मम्मीचा किंवा पप्पांचा जरा जरी डोळा चुकला तरी ही लहान मुलं पसार होऊन जातात. मात्र आपल्या मुलाला पार्कमध्ये एकटं खेळायला सोडणं एका महिलेला चांगलच महागात पडलंय. यात त्या मुलाचा जीव जाता जाता वाचलाय.
ग्लासगो येथील महिलेनं ग्लासगो लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की ती आपल्या मुलासोबत कॅरमाईल न्यु पार्क (Carmyle New Park) इथे फिरण्यासाठी गेली होती. तिथे दोघंही हरीण पाहत होते. अचानक तिनं पाहिलं की तिचा मुलगा एका काळ्या मांजराच्या जवळ गेला आहे. तिच्या मुलाला हा कुत्रा असल्याचं वाटलं. मात्र, महिलेनं त्याला पाहताच ओळखलं. ती काळी वाघिण होती. महिलेनं सांगितलं, की या वाघिणीनं तिच्या मुलाकडे झेप घेतली. मात्र, महिलेनं आरडाओरडा करताच ती जंगलाकडे पळाली.या महिलेच्या म्हणण्यानुसार आता हे पार्क अत्यंत असुरक्षित आहे आणि त्या वाघिणीला न पकडल्यास ती दुसऱ्या कोणावर हल्ला करू शकते. याबाबत बोलताना मात्र, पार्क व्यवस्थापनानं सांगितलं, की ते वाघिणीचा शोध घेत आहेत. आतापर्यंत त्यांना काही खुणा सापडलेल्या नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे, की ही एखादी साधी मांजर असावी.