कोट्याधीश बापाने 20 वर्ष मुलाला लागू दिला नाही संपत्तीचा पत्ता, केलं गरीबीचं नाटक कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:17 AM2024-03-26T10:17:03+5:302024-03-26T10:17:34+5:30
24 वर्षीय मुलाने मीडियाला सांगितलं की, त्याच्या वडिलानी 20 वर्ष आपली आर्थिक स्थिती त्याच्यापासून लपवून ठेवली.
एका मोठ्या कंपनीच्या आणि कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीच्या मालकाने आपल्या मुलापासून 20 वर्ष लपवून ठेवलं की तो श्रीमंत आहे. जेव्हा मुलाने आपलं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा त्याला याबाबत सांगण्यात आलं. सध्या या घटनेची सोशल मीडिया चांगलीच चर्चा होत आहे. 24 वर्षीय झांग जिलोंगने स्थानिक मीडियाला सांगितलं की, त्याचे वडील झांग योडुंग यानी 20 वर्ष आपली आर्थिक स्थिती त्याच्यापासून लपवून ठेवली. जेणेकरून मला मेहनत करूनच यश मिळावं.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, 51 वर्षीय झांग सीनिअर हुनान स्पायसी ग्लूटेन लातियाओ ब्रॅंड माला प्रिन्सचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. जे दर वर्षाला 600 मिलियन युआन म्हणजे 83 मिलियन अमेरिकन डॉलर मूल्याच्या वस्तू बनवतात. ज्यावेळी झांग ज्यूनिअरचा जन्म झाला होता त्याच वर्षी ही कंपनी सुरू करण्यात आली होती. झांग ज्यूनिअरने सांगितलं की, तो पिंगजियांग काउंटीच्या एका सामान्य फ्लॅटमध्ये वाढला. झांग ज्युनिअरला आपल्या वडिलाच्या कंपनीबाबत माहीत होतं. पण त्यानी मुलाला सांगितलं होतं की, त्यानी कंपनी चालवण्यासाठी खूपसारं कर्ज घेतलं आहे.
त्यांनी आपल्या श्रीमंतीचा फायदा न घेता हुनानची राजधानी चांग्शा येथील सगळ्यात चांगल्या सेकेंडरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. यूनिवर्सिटीतून पदवी मिळाल्यानंतर झांग ज्यूनिअरचं स्वप्न होतं की, त्याला एक चांगली नोकरी मिळावी आणि त्या पैशातून त्याला वडिलांचं कर्ज फेडायचं होतं.
मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर झांग सीनिअरने आपल्या मुलाला सांगितलं की, आपण खूप श्रीमंत आहोत आणि ते एका नव्या घरात रहायलाही गेले. ज्याची किंमत 1.4 मिलियन डॉलर आहे. आता मुलगा आपल्या वडिलांचा बिझनेस पुढे नेण्यासाठी काम सुरू करणार आहे.