वेस्टनमधील सीवर्ड हॉटेलमध्ये गाइड डॉगसह आलेल्या महिलेला कॉफी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:55 PM2017-09-09T23:55:14+5:302017-09-09T23:55:18+5:30
असाच प्रसंग मॅगी बर्गेस या महिलेवर आला. वेस्टनमधील सीवर्ड हॉटेलमध्ये मॅगी यांना कॉफी प्यायची होती. त्या त्यांचा मार्गदर्शक श्वान अॅनी (गाइड डॉग) याच्यासह हॉटेलमध्ये येताच त्यांना येथून जा, असे सांगण्यात आले.
असाच प्रसंग मॅगी बर्गेस या महिलेवर आला. वेस्टनमधील सीवर्ड हॉटेलमध्ये मॅगी यांना कॉफी प्यायची होती. त्या त्यांचा मार्गदर्शक श्वान अॅनी (गाइड डॉग) याच्यासह हॉटेलमध्ये येताच त्यांना येथून जा, असे सांगण्यात आले. मॅगी यांना नऊ वर्षांपूर्वी मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांची दृष्टी काहीशी अधू झाली आहे. वॉक आॅल ओव्हर कॅन्सर या कार्यक्रमात त्या सहभागी होत्या व रस्त्यात असलेल्या या हॉटेलमध्ये आल्या होत्या. कर्मचाºयाने त्यांना तुम्ही येऊ शकत नाही, असे सांगितले. मॅगी म्हणाल्या की, माझ्यासोबतचा कुत्रा हा माझा मार्गदर्शक (गाइड डॉग) आहे. त्यामुळे मला येऊ द्या. मॅगी यांना त्या कर्मचाºयाने बाहेर काढले व तुमचा दिवस छान जावा, अशा शुभेच्छाही दिल्या. दुकाने, कॅफे, हॉटेल्स, टॅक्सी, गं्रथालये व इतर व्यावसायिक ठिकाणी गाइड डॉगसह असलेल्या लोकांना व्यवस्थित सेवा दिली गेली पाहिजे, असा नियम आहे. मॅगी म्हणाल्या की, मी घरी आले त्या वेळी खूपच अस्वस्थ होते. अॅनीने माझे आयुष्य बदलून टाकले असून, मला स्वावलंबी बनवून आत्मविश्वास दिला आहे. नंतर हॉटेलच्या प्रवक्त्याने मॅगी यांची घडलेल्या घटनेबद्दल मनापासून क्षमा मागितली. ज्याने तुम्हाला प्रवेश नाकारला, तो आता आमच्या सेवेत नसल्याचे म्हटले. आम्ही गेल्या ५० वर्षांपासून गाइड डॉग्ज आणि इतर साहाय्यक श्वानांचे स्वागत करीत आलो आहोत, असे हा प्रवक्ता
म्हणाला.