लाली-लीला... सयामी जुळ्या बहिणींपैकी एकीनं बांधली लगीनगाठ; व्हिडीओची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:54 AM2024-04-01T11:54:44+5:302024-04-01T12:02:54+5:30
34 वर्षीय बहिणी एबी आणि ब्रिटनी तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा 1996 मध्ये ओपरा विन्फ्रे शोमध्ये आल्या होत्या.
जन्मापासून एकाच शरीरात जुळलेल्या दोन बहिणींपैकी एकीने लग्न केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल हे कसं? तर या दोघी बहिणींचं शरीर एक आहे पण डोकी दोन आहेत. त्याचं नाव एबी हेंसल आणि ब्रिटनी हेंसल आहे. यातील डावीकडील एबीने माजी सैनिक आणि आता नर्स असलेल्या जोश बाउलिंगसोबत लग्न केलं आहे. तसं तर यांचं लग्न 2021 मध्ये झालं होतं. पण खुलासा आता झाला आहे. 34 वर्षीय बहिणी एबी आणि ब्रिटनी तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा 1996 मध्ये ओपरा विन्फ्रे शोमध्ये आल्या होत्या. नंतर त्यांची एक टीएलसी रिअॅलिटी सीरीज आली. त्यातून त्यांचं रोजचं जीवन दाखवण्यात आलं.
एबी हेंसलने फेसबुक प्रोफाइल फोटोही बदलला आहे. ती तिचं हे अकाउंट बहिणीसोबत शेअर करते. हा फोटो लग्न समारंभातील वाटत आहे. यात दोघींचं रोजचं जीवन दाखवलं जात होतं. व्हिडिओत कपल डान्स करताना दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, दोघी बहिणी अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये मुलांना शिकवतात. इथे त्या मोठ्या झाल्या.
डेली मेलने इन्स्टाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या त्या मुलांना शिकवत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एकाच शरीरात जखडल्या गेलेल्या दोन जुळ्या बहिणी एबी आणि ब्रिटनी रिअॅलिटी शोमध्ये दाखवत आहेत की, क्लासमध्ये मुलांना कसं शिकवलं जातं. एबी आता विवाहित आहे कारण तिने तिचा बॉयफ्रेंड जोश बाउलिंगसोबत गपचूप लग्न केलं आहे'.
Conjoined Twins Abby and Brittany Hensel get married. pic.twitter.com/kSi61Jd3t6
— UNIVERSAL FEEDS (@UNIVERSE_FEEDS) March 30, 2024
एबी आणि ब्रिटनी डाइसफॅलसमुळे जुळलेल्या जुळ्या बहिणी आहेत. त्या कंबरेखालील सगळे अवयव शेअर करतात. एबी तिच्या उजव्या हाताला नियंत्रित करते तर ब्रिटनी डाव्या बाजूला.
1990 मध्ये जन्माला आलेल्या मुलींच्या आई-वडिलांनी म्हणजे पॅटी आणि माइक हेंसल यांनी मुलींना ऑपरेशनद्वारे वेगळं न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी असं केलं कारण त्यांना सांगण्यात आलं होतं की, ऑपरेशन दरम्यान त्यांच्या जीवाला जास्त धोका होऊ शकतो.