जगातल्या वेगवेगळ्या देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. लोक आपापल्या घरात आहेत आणि त्यांना घराबाहेर न पडण्याचा आणि लोकांच्या संपर्कात न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण तरी काही लोक नियम मोडत असल्याचे सतत समोर येत आहे. सौदी स्टेट न्यूज एजन्सीने दिेलेल्या वृत्तानुसार, येथील एका व्यक्तीला नियम तोडल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला मोठा दंड ठोठावण्यात आलाय.
lifeinsaudiarabia.net या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सौदीतील प्रशासनाने लोकांना इशारा दिला आहे की, त्यांनी कर्फ्यूचा नियम तोडल्याचा कोणाताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नये. जे कुणी असं करतील त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. पण हे नियम धाब्यावर बसवत एका तरूणाने नाव्ह्याला घरी बोलावले आणि त्याच्यासोबत व्हिडीओ काढून सोशल मीडियात शेअरही केला.
आता या व्यक्तीला नियमानुसार, पाच वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा आणि 3 मिलियन म्हणजेच भारतीय करन्सीनुसार 30 लाख रूपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
या व्यक्तीने शेअर केलेल्या व्हिडीओत बघायला मिळतं की, सगळं काही बंद असतानाही तो एका नाव्ह्याला घरी येण्यास सांगतो. हे कायद्याचं उल्लंघन आहे. याने कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढू शकतं.