कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:30 PM2021-04-23T13:30:17+5:302021-04-23T13:45:31+5:30
CoronaVirus News : जेव्हा मागच्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा या गावानं आपल्या गावाला जोडत असलेले सगळेच मुख्य रस्ते बंद केले होते.
एकिकडे कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनच्या संक्रमणानं संपूर्ण देश हादरला आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्स न मिळणं तसंच मृतांचा वाढता आकडा सगळीकडे अशाच घडामोडी कानावर पडत आहेत. अशा भयावह वातावरणातही भारतातलं एक गाव पूर्णपणे कोरोनामुक्त असून माहामारीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. राजस्थानच्या सुखपूरा गावात १३ महिन्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.
जेव्हा मागच्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा या गावानं आपल्या गावाला जोडत असलेले सगळेच मुख्य रस्ते बंद केले होते. याशिवाय बाहेरून गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची तपासणी सुरू केली होती. सुरूवातीपासूनच या गावातील लोकांनी सावधगिरी आणि नियमाचे पालन करण्यास सुरूवात केली होती.
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खंडेलाच्या सुखपूरा गावातील लोकांनी कोरोनाच्या माहामारीत आपल्या गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन केले. ३००० लोकसंख्या असलेल्या गावात वैश्विक कोरोना माहामारीत गेल्या १३ महिन्यांपासून एकही पॉझिटिव्ह केस आलेली नाही. मागच्यावर्षापासून त्यांनी गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांना आत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.
कोणत्या व्हिटॅमिन किंवा सप्लीमेंटने तुमचा कोरोनापासून बचाव होईल? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...
ग्राम विकास अधिकारी वीरेंद सिंह यांनी सांगितले की, ''कोरोना काळात ग्रामीण प्रशासनानं चांगली मदत केली. त्यामुळे जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीनं कहर केलेला असूनही नियमांचे सक्तीनं पालन केल्यानं आम्ही सुरक्षित आहोत. ''
आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी
या गावात सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर अशा उपायांचा काटेकोरपणे वापर केला जात आहे. राजस्थानात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मात्र या गावात कोरोनाचा एकही रुग्ण न आढल्यामुळे हे गाव चर्चेचा विषय ठरलं आहे.