कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक कोरोनापासून बचावासाठी वेगवेगळया उपायांचा अवलंब करत आहेत. सोशल डिस्टेंसिंग पाळणं, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं, वैयक्तीक तसंच सामाजिक पातळीवर स्वच्छतेचे नियम पाळले जात आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. जगभरातील सर्वच देशात कोरोनापासून वाचण्यासाठी प्रयत्न केले जात असताना एका देशात कोरोनाला रोखण्यासाठी चक्क परर्फ्युमचा वापर केला जात आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.
तुर्कीमध्ये कोरोनाला हरवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या परफ्युमचा वापर होतो आहे. तिथल्या स्थानिक भाषेत या परफ्युमला कोलोन्या म्हणतात. या परफ्युममध्ये एसेंशियल ऑइलचं प्रमाण खूप कमी असतं तुलनेने अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. हा परफ्युम तुर्कीच्या संस्कृतीचा भाग आहे.
या ठिकाणचे लोक जेवणापूर्वी लोकांच्या हातावर हा परफ्युम शिडकतात. स्वच्छतेच्या बाबतीत नेहमी अग्रस्थानी असलेल्या तुर्कीमध्ये सॅनिटायजर म्हणूनही याचा वापर केला जातो. यामुळे ८० टक्के विषाणू मरतात असं मानलं जात आहे. हा परफ्युम त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. म्हणून कोरोनाशी लढण्याचं शस्त्र म्हणून परफ्यूमचा वापर केला जात आहे.तुर्कीच्या आरोग्यंत्र्यांनी या परफ्यूमचे फायदे सांगत कोरोनाच्या लढाईत परफ्युम वापरण्याचा आदेश ११ मार्चला दिला आहे. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये तुम्हालासुद्धा उद्भवतेय 'ही' गंंभीर समस्या? जाणून घ्या कारणं आणि उपाय)
तुर्कीतील संपूर्ण जनतेला हा परफ्युम मिळावा यासाठी सरकारनेही मोठ्या उपाययोजना केल्या आहेत. १३ मार्चला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणं बंद केलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कलोन तयार होईल.या देशातील माध्यामांनी परफ्युमला एन्टी कोविड परफ्युम असं म्हटलं आहे. सध्या या परफ्युमची मागणी वाढली आहे . काही आठवड्यातच या परफ्युमची ऑनलाईन विक्री वाढून बाजारातील विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. ( हे पण वाचा-कोरोनापासून बचावासाठी फक्त ग्लोव्हज मास्क नाही तर आहारातील 'हे' पदार्थ ठरतील इफेक्टीव्ह)