बोंबला! कोर्टाने 'या' व्यक्तीला दिला ५ अब्ज किंमतीचा बंगला पाडण्याचा आदेश, मालक 'कोमात'...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 11:55 AM2021-02-09T11:55:26+5:302021-02-09T11:55:35+5:30
मीडिया रिपोर्ट्सनुसार हा बंगला फार मेहनतीने तयार करण्यात आला होता. २००५ पासून ते २००९ इतका कालावधी हा बंगला बांधण्यासाठी लागला होता.
आता विचार करा की, तुम्ही काही लाख रूपये खर्च करून घर बांधलं आणि मग कोर्टाने तुम्हाला ते पाडायला सांगितलं तर कसं वाटले? धक्का बसेल ना....? असाच धक्का Patrick Diter नावाच्या ब्रिटिश व्यक्तीला बसला आहे. त्याला कोर्टाने असा आदेश दिला आहे की, कुणीही हैराण होईल. पेट्रिकने ७० मिलियन डॉलर म्हणजेच ५ अब्ज रूपये खर्च करून बंगला बांधला होता. आता कोर्टाने म्हटलं आहे की, योग्य परमिट घेतलं नाही. म्हणून ५ अब्ज रूपयांचा हा बंगला पाडावा लागेल.
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रिकने त्याच्या या बंगल्याचं नाव Chateau Diter ठेवलं होतं. हा एक कस्टम बिल्ड बंगला होता. हा फ्रान्सच्या Provence मध्ये तयार केला होता. फ्रान्सच्या कोर्टाने हा निर्णय डिसेंबरमध्ये दिला. ज्यात म्हटलं आहे की, पेट्रिककडे हा ३२ हजार स्क्वेअर फूटाचा बंगला पाडण्यासाठी केवळ १८ महिने वेळ आहे. (हे पण वाचा : अरे देवा! चीनच्या अभिनेत्रीला नाकाची प्लास्टीक सर्जरी पडली महागात, याचा तिने कधी विचारही केला नसेल!)
मीडिया रिपोर्ट्सनुसार हा बंगला फार मेहनतीने तयार करण्यात आला होता. २००५ पासून ते २००९ इतका कालावधी हा बंगला बांधण्यासाठी लागला होता. यात इटलीहून आणलेले मौल्यवान दगडही लावण्यात आले होते.
दोन हेलिपॅड
पेट्रिकची ही प्रॉपर्टी Monaco जवळ आहे. इथे दोन हेलिपॅड तयार करण्यात आले होते. यात १७ एकरची बाग आहे. आतच एक तलाव असून जैतूनची अनेक झाडे आहेत. या बंगल्यात एकूण १८ खोल्या आहेत. १५ व्या शतकाप्रमाणे काही फायर प्लेस बनवण्यात आले आहेत. अनेक महागड्या पेंटींग्सही इथे लावल्या आहेत. (हे पण वाचा : बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं')
एका रात्रीचं भाडं किती?
या बंगल्यात एक रिसेप्शन रूमही आहे. तसेच एक लायब्ररी, सिनेमासाठी स्क्रीनिंग रूम, लाउंज, अनेक डायनिंग रूम, एक स्टीम रूम, स्टाफ किचन आणि एक वाइन टेस्टिंग रूमही आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा बंगला एक वेडींग स्पॉट आहे. ३०० डॉलर ते १ हजार डॉलर इतका एका व्यक्तीचा एका रात्री इथे राहण्याचा खर्च आहे.
कोर्टाने का दिला असा निर्णय?
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रिकने बिल्डींगचं परमिट घेतलं होतं. इतकेच काय तर परमिटचे कागदपत्रे येण्याआधीच त्याने बंगल्याचं निर्माण कार्य सुरू केलं होतं. परमिटमध्ये ते काहीच देण्यात आलं नव्हतं जे बंगल्यात बनवलं जाणार आहे. याच कारणाने कोर्टाने हा बंगला पाडण्याचा निर्णय दिला आहे.