कडक सल्यूट! अनोळखी व्यक्तींना किडनी दान करून मुलींनी मृत वडिलांना दिली अनोखी श्रद्धांजली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 01:15 PM2020-06-20T13:15:26+5:302020-06-20T13:24:54+5:30
Mark Goralski हे बऱ्याच महिन्यांपासून किडनीसंबंधी समस्यांशी लढत होते. त्यातच 2018 मध्ये त्यांचं निधन झालं.
अमेरिकेतील इलिनोइसमध्ये दोन बहिणींनी त्यांच्या मृत वडिलांना एक आगळी-वेगळी आणि कौतुकास्पद श्रद्धांजली वाहिली आहे. या दोन मुलींनी जे केलं ते वाचून तुम्हीही काहीना काही शिकू शकता. दोन्ही बहिणींनी वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी अनोळखी व्यक्तीला आपल्या किडनी दान केल्या आहेत. या गोष्टीसाठी दोघींचही भरभरून कौतुक केलं जातंय. इतकंच नाही तर त्या इतरांनाही अवयव दानासाठी प्रोत्साहन देत आहेत.
Mark Goralski हे बऱ्याच महिन्यांपासून किडनीसंबंधी समस्यांशी लढत होते. त्यातच 2018 मध्ये त्यांचं निधन झालं. कदाचित वेळेवर त्यांना किडनी मिळाली असती तर ते वाचूही शकले असते. पण असं झालं नाही. त्यांची मुलगी Bethany Goralski त्यांना किडनी देण्यासाठी तयार होती. पण डॉक्टरांचं मत पडलं की, त्यांचे वडील ट्रान्सप्लांटसाठी पूर्णपणे फिट नाहीत. कारण त्यांनी 2011 मध्येही एकदा किडनी ट्रान्सप्लांट केली होती. मार्च 2019 मध्ये दोघींनी त्यांच्या किडनी दान केल्या. मात्र, सोशल मीडियात पु्न्हा एकदा या घटनेची चर्चा होऊ लागली आहे.
Bethany आणि तिची बहीण Hannah ने वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. दोघींनीही अनोळखी लोकांना आपल्या किडनी दान केल्या. Hannah म्हणाली की, 'आम्हाला ज्या अडचणीचा सामना करावा लागला, तोच इतर परिवारांना करावा लागू नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही दोघींनी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला'.
Abcnews ने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही मुलींचं मत आहे की, जर आज त्यांचे वडील असते तर फार आनंदी झाले असते. Bethany ने तरूणांना सांगितले की, त्यांनी अवयव दानासाठी पुढे यायला पाहिजे. ती तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहन देते. तिने सांगितले की, किडनी दान केल्यावर 10 दिवसातच ती रिकवर झाली. दोघी बहिणी सध्या फिट आहेत.
नोकरी गेली, म्हणून आजोबांनी सुरू केलं यु-ट्यूब चॅनेल; अन् महिन्याभरात केली कमाल....
बाबो! तरूणीने एका बुक्कीत फोडली हवेतील विमानाच्या खिडकीची काच, इतर प्रवाशी 'कोमात'...