'ये हम है... ये हुक्के है... और अब पावरी नहीं हो रही है'; पोलिसांचं भन्नाट ट्वीट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:36 PM2021-03-08T12:36:40+5:302021-03-08T12:38:53+5:30
पोलिसांचं हे ट्वीट तुफान झालं व्हायरल
सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इंस्टा स्टार दानानीरचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पावरीच्या नावाने खूप लोकप्रिय झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या रिअॅक्शनही दिल्या होत्या. तर काहींनी यावर गाणंही तयार केलं. परंतु आता पावरी वरून दिल्लीपोलिसांनीच एक भन्नाट ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवैधरित्या सुरू असलेला हुक्का बार सीज केल्यानंतर दिल्लीपोलिसांनी केलेलं ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे.
पश्चिम दिल्ली परिसरात दिल्ली पोलिसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर छापा टाकला. यावेळी त्यांनी त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हुक्का जप्त केला. त्यानंतप पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा एक फोटो शेअर केला. तसंच यासोबत एक संदेशही लिहिला आहे. ये हम है... ये हुक्के है... और अब पावरी नहीं हो रहीं है... अवघ्या काही वेळातच त्यांचं हे ट्वीट तुफान व्हायरल झालं.
Yehe Hum hain..
— Addl DCP-I WEST DISTT (@i_addl) March 7, 2021
Yehe Hooke Hain..
Aur ab Pawri nahi ho rahi hai
PS- Some Pawris are not only injurious to health they are illegal too. Seized 24 Hooka from Rajouri Garden area. @CPDelhi@LtGovDelhi@DCPWestDelhi@DelhiPolice
रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी एका रेस्तराँमध्ये तपास केला. यावएळी त्यांना कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं. तसंच अनेक जण या ठिकाणी हुक्क्याचं सेवन करत असल्याचंही दिसून आलं. जेव्हा पोलिसांनी रेस्तराँच्या मॅनजरशी चौकशी केली तेव्हा पोलिसांना त्यांनी आत प्रवेशापासून रोखलं. दरम्यान, यावर पडदा टाकला जावा असं त्यांना वाटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर आत तपास केल्यावर मोठ्या प्रमाणात हुक्का सापडला. पोलिसांनी हे हुक्का सीज केला.