'हा' मासा तुम्हाला देऊ शकतो 440 व्होल्टचा झटका; इलेक्ट्रिक फिश अशी आहे ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:53 PM2019-10-09T17:53:58+5:302019-10-09T18:03:02+5:30
आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव आढळून येतात. काही विशाल असतात तर काही अगदी छोटेसे. तसेच काही जीव त्यांच्यातील काही गोष्टींमुळे अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनतात.
आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव आढळून येतात. काही विशाल असतात तर काही अगदी छोटेसे. तसेच काही जीव त्यांच्यातील काही गोष्टींमुळे अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनतात. आज आपण असाच एक हटके जीव म्हणजेच माशाबाबात जाणून घेणार आहोत. हा मासा म्हणजे, चालता फिरता विजेचा झटका असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. हा मासा आपल्या शिकाराला जाळ्यात अडकवण्यासाठी विजेचे झटके देऊन मारून टाकतात.
तुम्हाला हे वाचून नक्कीच अनेक प्रश्न पडले असणार, कसं बरं मासा विजेचा झटका देऊ शकतो? किंवा मग हा नक्की मासाच आहे ना? यांसारख्या अनेक प्रश्नांनी तुम्हाला भंडावून सोडलं असेल. पण आम्ही खरं सांगतोय. इलेक्ट्रिक कॅटफिश आणि इलेक्ट्रिक ईल नावाचे मासे आपलं शिकर मारण्यासाठी विजेच्या हाय व्होल्टेज झटक्यांचा वापर करतात.
माशांद्वारे सोडण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक वेव या त्यांच्या शरीरात असलेल्या पेशींमधून म्हणजेच, इलेक्ट्रोलाइट्समधून निर्माण होतात. जेव्हा एखादं इलेक्ट्रोलाइट उत्तेजित करण्यात येतं त्यावेळी त्या पेशींवर असलेले आयर्न अॅक्टिव्ह होतात आणि विज उत्पन्न होते.
उदाहरणार्थ इलेक्ट्रिक कॅटफिश जवळपास 300 ते 500 व्होल्टचा विजेचा झटका देऊन आपलं सावज टिपतात. हा मासा प्रामुख्याने रात्रीच्यावेळी शिकार करतो. तसेच हा मासा नील नदीमध्ये आढळून येतो.
इलेक्ट्रिक कॅटफिशप्रमाणेच इलेक्ट्रिक ईल नावाचा मासा आपली शिकार करण्यासाठी जवळपास 600 व्होल्टपर्यंत विजेचा झटका देऊ शकतात. एवढा हायव्होल्ट विजेचा झटका एका घोड्याची शिकार करण्यासाठी पुरेसा आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा मासा आपल्या शरीरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्युत लहरी निर्माण करत असला तरिही त्यामुळे मात्र त्याला स्वतःला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. इतर लोकांसाठी मात्र हा विद्युत झटका प्राणघातक ठरतो.