हे सगळ्यांनाच माहीत आहे की, पाणी हे जीवन आहे. जर पाणी नसेल तर मनुष्यच काय प्राणीही मरतील. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असाही प्राणी आहे जो आयुष्यभर पाणी न पिता जिवंत राहतो. हा प्राणी कधीच पाणी पित नाही आणि वाळवंटात जिवंत राहतो. सांगितलं तर असंही जातं की, जर त्याने चुकून पाणी प्यायलं तर त्याचा जीव जातो. ऑनलाइन प्लॅटफार्म कोरावर याचं नाव विचारण्यात आलं.
जगात उंदराची एक अशी प्रजाती आहे जी पाणी न पिता आयुष्यभर राहू शकते. ही प्रजाती उत्तर अमेरिकेच्या वाळवंटात आढळून येते. याला कांगारू उंदीर म्हणून ओळखलं जातं. हा जगातला एकटा जीव आहे जो पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो. याचे पाय आणि शेपटी कांगारूसारखीच असते. त्यामुळेच त्याला कांगारू रॅट म्हटलं जातं. दिसायला तो एक छोटा कांगारूच दिसतो. हे कांगारू सारखेच उड्याही मारतात.
कांगारू रॅट वाळवंटात राहतात आणि भलेही ते पाणी पित नसले तरी त्यांच्या शरीरात भरपूर पाणी असतं. ज्यामुळे इतर प्राणी त्यांना मारून खातात आणि आपली तहान भागवतात. यांचे समोरचे पाय लहान आणि डोकं मोठं असतं. डोळे लहान असतात. हे जास्तकरून कॅक्टस किंवा वाळवंटात उगवणाऱ्या झाडांची मुळं खाऊन जगतात. असंही मानलं जातं की, त्यांची बनावटच अशी आहे की, त्यांना पाण्याची जास्त गरज लागू नये. त्यांच्यावर रिसर्च केला तेव्हा वैज्ञानिकांना आढळलं की, हे जीव बियांमधून मिळणाऱ्या मेटाबोलाइज्ड पाण्यावर जिवंत राहतात.