काही दिवसांपूर्वी एका महिलेने सोन्याचे दागिने आणि वेगवेगळ्या वस्तू खाल्ल्याची घटना समोर आली होती. नंतर पोट दुखल्यावर ऑपरेशन करून या वस्तू काढण्यात आल्या होत्या. या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं समोर आलं होतं. अशीच एक वेगळी आणि विचित्र घटना समोर आली आहे. एका कैद्याने स्वत:ला जीवे मारण्यासाठी एक टूथब्रश २० वर्षांआधी गिळंकृत केला होता. आता डॉक्टरांनी हा ब्रश छोट्या आतड्यांमधून बाहेर काढला आहे. चीनच्या शेनझेनमधील ही घटना आहे.
ली असं नाव असलेल्या या व्यक्तीच्या पोटात जोरात वेदना होऊ लागल्या होत्या. त्यामुळे तो लगेच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला सिटी स्कॅनसाठी पाठवले. नंतर रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण झाले. त्यांनी एंडोस्कोपीच्या माध्यमातून पोटातील टूथब्रश रूग्णाच्या पोटातून बाहेर काढला.
डॉक्टरांनी विचारल्यावर ५१ वर्षीय ली ने सांगितले की, २० वर्षांआधी तुरूंगात असताना त्याने आत्महत्येच्या हेतून टूथब्रश गिळंकृत केला होता. पण तो वाचला. ली हा एचआयव्ही ग्रस्त झाला होता. त्याने आत्महत्या करण्यासाठी टूथब्रश गिळंकृत केला होता. पण त्याने त्याला काही झाले नाही. त्याने त्याची शिक्षा पूर्ण केली.
ली ने सांगितले की, तुरूंगात त्याने ड्रग्स घेणे बंद केले होते. नंतर त्याचा HIV चा उपचारही सुरू झाला होता. जेव्हा तो पूर्णपणे बरा झाला तेव्हा त्याला तुरूंगातून सोडण्यात आले.