Airport Prohibited Words: बऱ्याच ठिकाणांवर आपण जातो तेव्हा काही गोष्टींची बंदी असते. कुठे कमी कपड्यांची बंदी तर कुठे आणखी कशाची बंदी असते. त्यासाठी इशारा देणारे बोर्डही लावलेले असतात. काही ठिकाणी तर याबाबत सूचना दिल्या जातात. पण काही ठिकाणी काहीच सांगितलं जात नाही. असंच एक ठिकाण म्हणजे एअरपोर्ट इथे तुम्ही कोणत्या वस्तू नेऊ शकत नाही हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. पण काय बोलू नये किंवा कोणते शब्द बोलू नये हे माहीत नसेल.
आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, एअरपोर्टवर कोणत्या शब्दांचा उच्चार करणं टाळलं पाहिजे. याबाबत तुम्हाला सांगितलं जात नाही. जर तुम्ही एअरपोर्टवर असे काही शब्द बोलले तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. नुकतंच दिल्लीच्या एअरपोर्टवरून दोन प्रवाशांना विमानात बसण्यापासून रोखण्यात आलं आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली.
एअरपोर्टवर न बोलावे असे शब्द
एक वेळ अशीही होती जेव्हा भारतात प्लेन हायजॅक करणं आणि दहशतवाद अशा घटना खूप वाढल्या होत्या. त्यामुळे फ्लाइट आणि एअरपोर्टसंबंधी नियम आणखी कठोर करण्यात आले. तशी तर एअरपोर्ट अथॉरिटी किंवा सरकारकडून एअरपोर्टवर बोलण्यास बंदी असलेल्या शब्दांची यादी जाहीर केली नाही. पण पण तरीही व्यावहारिकपणे काही शब्द ज्यांचा वापर तुम्ही तिथे केला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
त्या शब्दांमध्ये बॉम्ब, एक्सप्लोसिव, हल्ला, दहशतवादी अशा हिंसक शब्दांचा समावेश करता येईल. दिल्ली एअरपोर्टवर जेव्हा दोन प्रवाशांची जेव्हा सेकंडरी लॅडर पॉइंट सिक्युरिटीवर चेकिंग सुरू होती. तेव्हा एक व्यक्ती म्हणाली की, 'तुम्ही काय कराल मी काय न्यूक्लिअर बॉम्ब नेत आहे का?'. त्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्यात आलं आणि विमानात बसण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली.
जर एअरपोर्टवर असे शब्द कुणी उच्चारले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. दिल्ली एअरपोर्टवर दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 182 नुसार अटक करण्यात आली आहे. यानुसार एखाद्या लोक सेवकाला कुणी इजा करण्यासाठी आपल्या कायदेशीर शक्तीचा वापर करत खोटी माहिती देणं कायदेशीर गुन्हा आहे.