पूर्व यूरोपमध्ये एका छोटा देश आहे मॉल्डोवा. या देशाला यूरोपमधील सर्वात गरीब देशापैकी एक मानलं जातं. या गावातील रस्तेही फारच लहान आहेत. कारऐवजी या देशात घोडागाडी अधिक वापरल्या जातात. पण देशाची एक खासियत अशीही आहे जी या देशाला जगात ओळख मिळवून देते. या देशात जगातले दोन सर्वात मोठे वाईनचे भांडार आहेत. मॉल्डोवा आपल्या द्राक्षाच्या शेतीसाठी लोकप्रिय देश आहे.
मॉल्डोवामध्ये छोटी छोटी डोंगरे आहेत. दोन मोठ्या नदया आहेत. वातावरण द्राक्षाच्या शेतीसाठी उपयुक्त असं आहे. कधीकाळी सोव्हिएत युनियनचा भाग राहिेलेल्या मॉल्डोवाबाबत बोललं जातं की, यूरोपमध्ये उघडली जाणारी प्रत्येक दुसरी बॉटल याच जमिनीतून येते.
मॉल्डोवामध्ये वाईन तयार करण्याचं काम हजारों वर्षांपासून सुरु आहे. काही शोधांनुसार असे समोर आले आहे की, मॉल्डोवामध्ये २५ मिलियन वर्षांपासून द्राक्षाची शेती केली जाते. तर द्राक्षापासून वाईन तयार करण्याचं काम ४ हजार ते ५ हजार वर्षांपासून होत आहे. पण याचं खरं सौदर्य जमिनीखाली आहे. इथे मिलेस्टी मिच कम्यूनमध्ये वाईनच्या बॉटल्सनी भरलेल्या गोदाम आहेत. ज्या अनेक किमीच्या आहेत.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, इथे जगातलं सर्वात मोठं वाईन कलेक्शन आहे. यात २० लाख बॉटल्स संग्रहित आहे. ही गुहा २०० किलोमीटर लांब आहे, तर याचा ५५ किमीचा भागच वापरात आहे. ही गुहा आधी चून्याच्या दगडाची खाण होती. जेव्हा खाण बंद झाली तेव्हा १९६० च्या दशकात या खाणीला वाईन सेलर बनवण्यात आलं.
वाईनची ही गुहा इतकी मोठी आहे की, यातील रस्त्यांना नावेही ठेवण्यात आले आहेत. जवळच एक क्रिकोवा वायनरी सुद्धा आहे, जी जगातली दुसरी सर्वात मोठी वाईनचा भांडार असलेली जागा आहे. इथे १५ लाख वाईनच्या बॉटल्स ठेवल्या आहेत. मिलेस्टी मिचप्रमाणेच क्रिकोवा गुहेतील रस्त्यांना नावे देण्यात आली आहेत. ही नावे प्रसिद्ध वाईनच्या नावावर देण्यात आले आहेत.
मॉल्डोवामध्ये निर्मित केली जाणारी वाईनचा एक तृतियांश भाग रशियाला निर्यात केला जातो. पण मॉल्डोवा सरकार आणि रशियातील संबंधी जरा ताणले गेले आहेत. त्यामुळे पुतीन यांनी वाईनच्या आयातीवर बंदी घातली आहे. कारण मॉल्डोवा सरकारने यूरोपीय यूनियनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र असेही बोलले जाते की, आताही स्मगलिंग करुन मॉल्डोवामधील वाईन रशियामध्ये पोहोचवली जाते.