अरे देवा! रागाच्या भरात जेसीबी घेऊन कंपनीच्या प्लांटमध्ये घुसला, कोट्यवधींच्या कार्सचा केला चेंदामेंदा..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 01:56 PM2021-01-05T13:56:12+5:302021-01-05T14:00:07+5:30
या व्यक्तीचं वय ३८ वर्षे आहे. त्याने कथितपणे साधारण ५० ब्रॅंन्ड न्यू व्हॅनची तोडफोड केलीय. यासाठी त्याने आधी जेसीबी चोरी केला.
लोक रागाच्या भरात काय काय कारनामे करतात हे नेहमीच बघायला मिळतं. असाच कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मर्सिडीज बेन्जमधील एक कर्मचारी इतका रागात होता की त्याने कायद्याचाही विचार केला नाही. त्याने आधी एक जेसीबी चोरी केला आणि नंतर तो चालवत कंपनीच्या प्लांटमध्ये घेऊन गेला. इथे जेसीबी आत घुसवून त्याने तोडफोड केली. ज्यामुळे कंपनीला ६ मिलियन डॉलर म्हणजे ४३.८ कोटी रूपयांचं नुकसान झालं.
या व्यक्तीचं वय ३८ वर्षे आहे. त्याने कथितपणे साधारण ५० ब्रॅंन्ड न्यू व्हॅनची तोडफोड केलीय. यासाठी त्याने आधी जेसीबी चोरी केला. तो जेसीबी चालवत तो २९ किलोमीटर अंतरावरील स्पेनमधील कंपनीच्या प्लांटमध्ये पोहोचला आणि हा धिंगाणा घातला.
La Ertzaintza detiene a un hombre de 38 años, ex trabajador de la empresa, que tras robar una excavadora, ha destrozado más de 50 furgonetas de la fábrica de Mercedes-Vitoria. Más en @radioeuskadipic.twitter.com/13Mpo4PlqR
— Dani Álvarez (@DaniAlvarezEiTB) December 31, 2020
रिपोर्टनुसार, ही घटना गुरूवारी सकाळी घडली. डॅमेज व्हॅन्समध्ये मर्सिडीज बेन्ज व्ही क्लासचा समावेश आहे. ज्यांची किंमत जवळपास ९० हजार पाउंड(८९,४४,९६९ रूपये) इतकी आहे. सोबत आणखीही काही कार्सचं नुकसान झालं.
या घटनेचे फोटो ३१ डिसेंबरला ट्विटर यूजर @DaniAlvareEiTB ने शेअर केलेत. ज्या बघू शकता की, कशाप्रकारे जेसीबीच्या मदतीने गाड्यांना चिरडलं गेलं आहे. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. ही व्यक्ती २०१६ आणि २०१७ दरम्यान मर्सिडीज बेन्जच्या साइटवर काम करत होती.
स्थानिक पोलिसांनुसार, 'व्हिक्टोरियाच्या अधिकाऱ्यांनी ३८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ज्यात आधी एका ठिकाणाहून जेसीबी चोरी केला. आणि जेसीबीने मर्सिडीजच्या ५० गाड्यांचं नुकसान केलं. या व्यक्ती असं का केलं समोर येऊ शकलं नाही. पोलीस तपास करत आहेत.