जगातल्या टॉप चोरांनीच केला खुलासा, चोरीसाठी कशा घरांची करतात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:13 PM2021-10-01T16:13:09+5:302021-10-01T16:13:43+5:30
अनेक लोकांना ही भीती असते की, त्यांच्या घरात चोरी तर होणार नाही ना. कुठे बाहेर जात असताना लोक बऱ्याचदा विचार करतात.
आजच्या काळात कुणासोबत कोणती घटना घडेल काही सांगता येत नाही. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चोरी-मर्डरसारखे गुन्हे फारच कॉमन झाले आहेत. अशात काही असेही चोर आहेत ज्यांनी गुन्हेगारी विश्वाला अलविदा केलंय आणि काही सिक्युरिटी एक्सपर्ट्सनी सांगितलं की, कशाप्रकारच्या घरात चोरी होण्याची शक्यता जास्त असते. ही घरं लुटण्यासाठी चोर बेस्ट मानतात.
अनेक लोकांना ही भीती असते की, त्यांच्या घरात चोरी तर होणार नाही ना. कुठे बाहेर जात असताना लोक बऱ्याचदा विचार करतात. घराला कितीही लॉक लावले तरीही चोरी होते. पण जर काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही चोरांच्या नजरेतून वाचू शकता. एक्सपर्ट्सनी मिळून एक अशी लिस्ट तयार केली आहे. ज्याच्या आधारावर चोर ठरवतात की, त्यांना कोणत्या प्रकारच्या घरात चोरी करायची आहे. या लिस्टमधील डीटेल्स जगातल्या अनेक अशा चोरांशी बोलून बनवले आहेत, ज्यांनी गुन्हेगारी विश्व सोडलं.
सिक्युरिटी वेबसाइट safe.co.uk ने अनेक चोरांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमधून हे जाणून घेतलं गेलं की, अखेर चोर कशा घराची चोरी करण्यासाठी निवड करतात? याच आधारावर सांगण्यात आलं की, तुम्ही कशाप्रकारे तुमचं घर चोरांच्या नजरेपासून वाचवू शकता. चोरांनी यात सर्वातआधी सांगितलं की, जी घरी रिकामी आहेत ती घरं त्यांच्या निशाण्यावर टॉपवर राहतात. जर चोरांना समजलं की, घरातील लोक सुट्टीवर बाहेर गेले आहेत, तर ते घर चोरी करण्यासाठी बेस्ट मानलं जातं.
आणखीही काही गोष्टींचा समावेश
रिकाम्या घरासोबतच चोर आणखीही काही गोष्टी लक्षात घेतात. ज्या घरांमध्ये कुत्रे नाहीत, अशी घरंही चोरांना जास्त आवडतात. जर घरात कुत्रा असेल तर चोरीची शक्यता फार कमी असते. तसेच ज्या घरांबाहेर रात्रभर प्रकाश असतो. असे घर चोर टाळतात. ज्या घरांसमोर लाईट नसतात त्या घरात चोरी होण्याचा धोका जास्त असतो. त्यासोबतच ज्या घरांसमोर अनेक चिठ्ठ्या किंवा सामान फेकलेलं असतं, तिथेही चोर सहजपणे शिरतात. त्यांच्यानुसार, जर घरात बऱेच दिवस कुणी नसेल किंवा आत राहणारा निष्काळजी असेल, अशाही घरात चोरी करतात.