डायनासॉरपेक्षाही शक्तीशाली आहे हा जीव, अणुबॉम्ब टाकला तरी राहतील जिवंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:17 PM2024-05-21T15:17:10+5:302024-05-21T15:17:35+5:30

पृथ्वीवर सगळ्यात शक्तीशाली प्राणी कुणी असेल तर ते आहेत झुरळ. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जर अणुबॉम्बही टाकण्यात आला तरी हे जीव जिवंत राहतील.

Expert claim Cockroach is stronger than dinosaurs can survive in nuclear war | डायनासॉरपेक्षाही शक्तीशाली आहे हा जीव, अणुबॉम्ब टाकला तरी राहतील जिवंत!

डायनासॉरपेक्षाही शक्तीशाली आहे हा जीव, अणुबॉम्ब टाकला तरी राहतील जिवंत!

कुणाला जर विचारलं की, जगात सगळ्यात शक्तीशाली प्राणी कोणते होते? तर कुणीही सामान्यपणे डायनासॉरचं नाव घेतील. पण सगळ्यांचा हा अंदाज चुकीचा ठरतो. कारण पृथ्वीवर सगळ्यात शक्तीशाली प्राणी कुणी असेल तर ते आहेत झुरळ. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जर अणुबॉम्बही टाकण्यात आला तरी हे जीव जिवंत राहतील.

झुरळ जगातील सगळ्यात जुने किटक आहेत. असा दावा केला जातो की, हे आकाराने भलेही लहान असतील, पण डायनासॉर पेक्षाही शक्तीशाली असतात. त्यांचे पाय तोडले तरी ते जिवंत असतात. ते जगातील सगळंच खातात. महत्वाची बाब म्हणजे हे सगळीकडे आढळतात.

झुरळांमध्ये खूप क्षमता असते. त्यांच्यात अनेक अनोखे गुण असतात. हे त्यांना निसर्गापासून मिळालं आहे. झुरळांमध्ये स्वत:ला वाचवण्यासाठी सगळे गुण आहेत. जर पृथ्वीवर परमाणु युद्ध झालं तर ते पृथ्वीवर जिवंत राहतील आणि त्यांच्यासोबत उंदीरही असतील. वैज्ञानिकांचं मत आहे की, झुरळ खूप शक्तीशाली आहेत तेव्हाच ते पृथ्वीला उल्कापिंड धडकली आणि डायनासॉर नष्ट झाले तरी हे जिवंत राहिले. 

झुरळ त्यांचं शरीर फार वेगळ्या पद्धतीने संतुलित ठेवू शकतात. कारण त्यांची शरीर सपाट असतं. यामुळेच ते कोणत्याही ठिकाणी लपू शकतात जिथे बाहेर काही प्रभाव पोहोचत नाही. झुरळ उष्णतेमध्ये मातीतील भेगांमध्येही लपून बसतात. 

तुम्ही वाचून अवाक् व्हाल की, झुरळांना तुम्ही पायाने किंवा शूजने चिरडलं तरी ते जिवंत राहतात. त्यांना जसाही धोका जाणवतो ते गोलाकार होतात. त्यांना पाहिलं तर वाटलं एखादी गोलाकार वस्तू पडली असेल. अंटार्कटिका सोडलं तर जगातील कोणत्याही ठिकाणी झुरळ असतात. जर त्यांना अंटार्कटिकामध्ये सोडलं तरी ते भीषण थंडीमध्येही तीन दिवस जिवंत राहू शकतात. 

झुरळ जे काही मिळेल ते खाऊ शकतात. तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. झुरळ साबण, वॉल पेपर, पेंट, कागद, कपडे, वायर अशा कित्येक गोष्टी खाऊन जिवंत राहतात. नदी-नाल्यांमध्ये तर त्यांना खूपकाही खायला मिळतं. झुरळ पृथ्वीवर जवळपास 35 मिलियन वर्षांपासून आहेत. त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी विशाल डायनासॉर यांना जन्म घेताना नंतर नष्ट होताना पाहिलं आहे. 

वैज्ञानिकांनुसार, झुरळ आजच्या हजारो किटकांचे पूर्वज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अब्जो वर्षापासून पृथ्वीवर असलेल्या या झुरळांमध्ये फार कमी बदल झाले आहेत. त्यातील एक म्हणजे त्यांचा केवळ आकार लहान झाला आहे.

Web Title: Expert claim Cockroach is stronger than dinosaurs can survive in nuclear war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.