फेमस गायिकेने लावलं पतीचं दुसरं लग्न, म्हणाली - मी बिझी असते आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 10:47 AM2024-04-06T10:47:00+5:302024-04-06T10:47:48+5:30
मलेशियातील एका फेमस सिंगरने आपल्या पतीसाठी दुसरी पत्नी शोधली आणि त्यांचं लग्न लावलं याचा खुलासा केला.
काही सिनेमांमध्ये आपण बघतो की, पत्नीच आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून देतात. यामागे काहीतरी कारणही असतं. पण खऱ्या आयुष्यात अशा महिला फार कमीच आढळतात. मलेशियातील एका फेमस सिंगरने आपल्या पतीसाठी दुसरी पत्नी शोधली आणि त्यांचं लग्न लावलं याचा खुलासा केला.
42 वर्षीय एजलाइन अरिफिन तिला एजलिन नावानेही ओळखलं जातं. ती एक फेमस सिंगर आहे आणि इन्स्टावर 173,000 फॉलोअर्स आहेत. ती मलेशियातील एक फेमस सेलिब्रिटी आहे.
नुकताच एजलिनने तिच्या 47 वर्षीय पती वान मोहम्मद हफीजमचं गेल्यावर्षी 26 वर्षीय तरूणीसोबत दुसरं लग्न लावल्याचा खुलासा केला. तिने सांगितलं की, ही तिचीच आयडिया होती. ती म्हणाली की, हा निर्णय तिने घेतला कारण दुसरी पत्नी तिच्या पतीसोबत रहावी आणि एजलिनला आपल्या करिअरवर फोकस करता यावा.
एजलिन म्हणाली की, 'मी एक बिझी व्यक्ती आहे. मला कामासाठी अनेकदा प्रवास करावा लागतो. मला घरातील कामासाठी कुणाची मदत हवी होती'. एजलिनने इन्स्टावर तिचा आणि तिच्या पतीचा एक फोटो शेअर केला. ज्यात तिने लिहिलं की, आम्ही अजूनही सोबत आहोत, अजूनही मजबूत आहोत.
दरम्यान मलेशिया एक मुस्लिम देश आहे आणि इथे एकापेक्षा जास्त लग्न करणं कायदेशीर आहे. इथे पुरूष चार लग्ने करू शकतात. यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागते.
एजलिन म्हणाली की, योग्य मुलगी शोधण्यासाठी तिने वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतला. शेवटी एक मुलगी मिळाली. एजलिनने खुलासा केला की, ती आणि तिच्या पतीची दुसरी पत्नी पतीसोबत एक-एक आठवडा घालवतात.
ती म्हणाली की, आम्ही महिला आहोत. आमच्यात काही ईर्षा असू शकते. पण माझ्यासाठी जर पती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो आणि पुरेसं प्रेम देऊ शकतो किंवा सांभाळ करू शकतो तर महिलांना त्याला शेअर करण्यात अडचण नसावी.