मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने वाघाशी दिला लढा
By admin | Published: June 6, 2016 10:22 AM2016-06-06T10:22:02+5:302016-06-06T10:34:49+5:30
र्व प्राण्यांमध्ये कुत्रा सर्वात इमानी प्राणी आहे. मालकाप्रती त्याच्या निष्ठा अत्यंत प्रामाणिक असतात. वेळ पडल्यास तो मालकासाठी प्राणही देऊ शकतो.
Next
ऑनलाइन लोकमत
शहाजहानपूर, दि. ६ - सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा सर्वात इमानी प्राणी आहे. मालकाप्रती त्याच्या निष्ठा अत्यंत प्रामाणिक असतात. वेळ पडल्यास तो मालकासाठी प्राणही देऊ शकतो. उत्तरप्रदेशातील शहाजहानपूरमध्ये एका चारवर्षांच्या कुत्र्याने मालकाला वाघाच्या तावडीतून वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान केल्याची घटना समोर आली आहे.
दुधवा नॅशनल पार्कजवळील बरबातपूर गावामध्ये शुक्रवारी रात्री गुरदेव सिंह हा शेतकरी त्याच्या घराबाहेर झोपला होता. त्यावेळी चार वर्षाचा जॅकी कुत्राही त्याच्या बाजूला झोपला होता. गुरुदेवच्या घराजवळ दक्षिण खेरीचे जंगल आहे. जंगलातून वाघ आपल्या मालकाच्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच जॅकीने झोपेत असलेल्या मालकाला जागे केले.
गुरुदेव झोपेतून उठत नाही तोच वाघाने त्याच्या दिशेने झडप घातली. जॅकीने लगेच वाघाच्या दिशेने झेप घेत त्याच्याशी दोन हात करण्यास सुरुवात केली. तेवढयावेळात गुरुदेवला काठी घेऊन बचावासाठी सज्ज होता आले. गुरुदेवचे कुटुंबिय मदतीसाठी येईपर्यंत वाघ जॅकीला खेचून जंगलात घेऊन गेला.
गावक-यांनी आसपासच्या परिसरात शोध घेतल्यानंतर त्यांना काही अंतरावर जॅकीचा सापळा सापडला. कुटुंबियांनी आणि गावक-यांनी जड अंतकरणाने जॅकीचे दफन केले.