नेहमीप्रमाणे पाण्यात मासेमारी (Fishing) करण्यासाठी उतरलेल्या मच्छिमारांना (Fishermen) अचानक अशी एक वस्तू (Precious thing) सापडली, ज्यामुळे ते मालामाल झाले. पाण्यात जाळं टाकून दिवसभर बसणे आणि मिळतील तेवढे मासे बाजारात विकून संसार चालवणं, हा मासेमारांचा दिनक्रम. एखाद्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त मासे सापडणं, हीच काय ती त्यांची चैन. मात्र एक दिवस मासेमारांना नदीत असं एक घबाड सापडलं, ज्यामुळे ते अक्षरशः मालामाल झाले.
इंडोनेशियात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या काही मच्छिमारांना नदीत काही बॉक्स तरंगत असल्याचं आढळलं. त्यांनी आपल्या होड्या त्या बॉक्सपाशी नेल्या आणि ते बॉक्स होडीत ओढून घेतले. ते बॉक्स फोडण्यात आले आणि त्यातील साहित्य पाहून सर्वांचेच डोळे आनंद आणि आश्चर्यानं मोठे झाले.
या पोस्टला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडोनेशियातील बांग्का बेलितुंग नदीपात्रात हे बॉक्स मासेमारांना सापडले आहेत. त्यात महागडे आयफोन्स, आयपॅड आणि मॅकबुक्स आहेत. या सर्व वस्तूंसह मासेमारांनी फोटो काढले असून तेदेखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. टिकटॉकवर हा व्हिडिओ आतापर्यंत १८ लाखपेक्षा अधिक जणांनी पाहिला असून १ लाख १८ हजार जणांनी तो लाईक केला आहे. या घटनेनंतर मासेमारांचं नशीब या विषय़ावर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली आहे.