विमानाच्या टॉयलेटमध्ये प्रवासी करतात रोमान्स, एअरहोस्टेसने केले अनेक अजब खुलासे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 12:41 PM2024-12-10T12:41:58+5:302024-12-10T12:52:16+5:30
अनेकदा विमानातील अशा काही गोष्टी समोर येतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. एका एअरहोस्टेसने नुकतेच विमानातील असेच काही धक्कादायक सीक्रेट्स सांगितले आहेत.
लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी आजकाल लोक विमानाने प्रवास करतात. विमानाच्या माध्यमातून कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येतं. अशात विमानाचा प्रवास आरामदायक सुखकर होण्यासाठी विमानाचा स्टाफ लोकांची काळजी घेतात. मात्र, अनेकदा विमानातील अशा काही गोष्टी समोर येतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. एका एअरहोस्टेसने नुकतेच विमानातील असेच काही धक्कादायक सीक्रेट्स सांगितले आहेत.
२८ वर्षीय एअरहोस्टेसने तिचे अनुभव शेअर करत सांगितलं की, तिने आतापर्यंत असा एकही पायलट बघितला नाही ज्याने त्याच्या पत्नीला दगा दिला नाही. एअरहोस्टेसने सांगितलं की, तिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत पाच पायलटसोबत काम केलं आहे. याशिवाय तिने अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ती कधी विसरू शकणार नाही.
एअरहोस्टेसने सांगितलं की, तिने अनेकदा प्रवाशांना विमानाच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवताना बघितलं आहे. विमानादरम्यान होणाऱ्या अशा संबंधाना 'माइल हाय क्लब' असं म्हटलं जातं. ज्यात कधी कधी एअरहोस्टेसही सहभागी असतात. या एअरहोस्टेसने स्पष्ट केलं की, ती कधीही 'माइल हाय क्लब'चा भाग नव्हती.
पुढे तिने सांगितलं की, "मी या गोष्टीने हैराण आहे की, यात प्रवाशांना काहीच समस्या होत नाही. मी अनेकदा पुरूष आणि महिलांना एकत्र टॉयलेटमधून बाहेर निघताना पाहिलंय. मला हेही माहीत होतं की, त्यांची भेट विमानातच झाली होती".
ती म्हणाली की, जोपर्यंत प्रवाशांना यापासून काही समस्या नसते तोपर्यंत फ्लाइट क्रू यावर काहीच बोलत नाहीत. त्यांना तसा अधिकारही नसतो. फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं की, "आम्ही सुद्धा मजा-मस्ती करतो, पण फ्लाइटच्या बाहेर. खासकरून अशा ठिकाणांवर जिथे हॉटेल, स्वीमिंग पूल, मद्य आणि कसीनो असतात".
एअरहोस्टेसने दावा केला की, तिचे असे अनेक सहकारी आहेत, जे विवाहित आहे. पण ते आपल्या पार्टनरला दगा देतात. पायलट आणि कॅबिन क्रू यांच्यात अफेअर असणं फारच कॉमन आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे स्थानिक नर्स आणि कॉल गर्ल्ससोबत संबंध असतात.