जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विचार बघायला मिळतात. त्यातील काही महत्त्वाचे असतात तर काही निरर्थक. पण फ्रान्समधील एका घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. फ्रान्समधील एका महापौरांनी घोषणा केली आहे की, जर एखादं कपल त्यांच्या परिसरात येऊ स्थायिक होणार असेल तर त्यांना मोफत वायग्राची गोळी दिली जाईल. या मागचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षात या शहराचा जन्मदर कमी झाला आहे.
जीन डेबोजी उत्तर फ्रान्सच्या मॉन्टेरूचे महापौर आहेत. त्यांनीच ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, 'जन्मदर वाढवण्यासाठी मी छोटी निळी औषधं वाटण्याच्या मताचा आहे. कारण ज्या गावात मुलं होणार नाहीत ते गाव ओस पडेल'.
जीन यांनी ही घोषणा तेव्हा केली जेव्हा गावातील दोन शाळा मुला-मुलींच्या कमी संख्येमुळे बंद पडण्याचा उंबरठ्यावर आहेत. स्थानिक रिपोर्टनुसार, जे कपल्स आधीच या शहरात राहत आहेत किंवा जे बाहेरून येऊन इथे स्थायीक होत आहेत, त्या सर्वांना वायग्राची गोळी वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महापौरांनी असंही सांगितलं की, त्यांना आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात वायग्रा गोळ्या उपलब्ध झाल्या नाहीत. या गोळ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थानिक कमिटीची ते परवानगी घेतील. पण, फ्रान्समध्ये डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय वायग्राची दिली जात नाही. अशात महापौर त्यांची घोषणा पूर्ण करू शकतील की, नाही यावरही शंका आहे.
फ्रान्समध्ये जन्मदर कमी झाल्याने देश चिंतेत आहे. ही चिंता दूर करण्यासाठी फ्रान्सने जन्मदर वाढवण्याची नीति अंगीकारली आहे. सरकार लहान मुलांना वाढवण्यासाठी कपल्सना अनेक सब्सिडी देत आहेत. अनेकप्रकारच्या चाइल्ड केअर सर्व्हिस आधीच आहेत. तसेच लहान मुलं तीन वर्षांचे होईपर्यंत आई-वडिलांना सुट्टीही मिळते.