घरात सापडली 200 वर्ष जुनी गुहा, आत गेल्यावर जे दिसलं ते पाहून हैराण झाले सगळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 09:36 AM2023-08-07T09:36:45+5:302023-08-07T09:38:56+5:30
ही घटना ब्रिटनच्या नॉटिंगममधील आहे. इथे सापडलेली गुहा ही 1800 च्या दशकातील असू शकते, जिचा वापर घरगुती तळघरासारखा होत असावा.
एका तरूणीला तिच्या घराखाली एक रहस्यमय गुहा आढळून आली. याची माहिती तिने मित्राना आणि टीचरला दिली. त्या गुहेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्या गुहेत गेले. ही फार जुनी असल्याचं मानलं जात आहे. ही घटना ब्रिटनच्या नॉटिंगममधील आहे. इथे सापडलेली गुहा ही 1800 च्या दशकातील असू शकते, जिचा वापर घरगुती तळघरासारखा होत असावा.
द सनच्या रिपोर्टनुसार, ही 200 वर्षांपेक्षा जास्त जुही गुहा तेव्हा काही मजूर इथे इमरजन्सी लाइट लावत होते. जेव्हा गुहेबाबत समजलं की, तेव्हा सगळे स्टुडंट आत गेले. तेव्हा त्यांना एक नवीन फ्लोर दिसली. दगडापासून तयार बेंच दिसला. भिंतीमध्ये काही रकाने दिसले. जिथे पदार्थ आणि पाणी स्टोर केलं जात होतं. या घरात शिफ्ट होण्याआधी तरूणी आणि तिच्या मैत्रिणींना या गुहेबाबत काहीच माहीत नव्हतं.
तरूणी म्हणाली की, ही काही फार मोठी गुहा नाही. ती जवळपास 6 फूट लांब आणि 4 फूट रूंद आहे. ही गुहा बघणं फारच रोमांचंक होतं. या गुहेत का असेल हे जाणून घेण्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो. आता आम्ही ही गुहा वापरणार आहोत.
तरूणी आणि तिच्या मित्रांनी स्थानिक पुरातत्ववाद्यांना याबाबत संपर्क केला. ते सुद्धा याबाबत समजल्यावर अवाक् झाले. त्यांनी अंदाज लावला की, ही गुहा जवळपास 2 शतकांआधी बनवण्यात आली असेल. ही गुहा एका घरगुती तळघरासारखी दिसते. पण ती आकाराने लहान आहे.