जगभरात अनेक महाग घड्याळं आहेत. काहींमध्ये डायमंड असतात तर काही घड्याळं सोन्याची बनवलेली असतात. पण सध्या एक अशी घड्याळ चर्चेत आहे जी खरेदी करणाऱ्या व्यक्तीने या घड्याळासाठी सहा पट जास्त किंमत मोजली आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ही एक सोन्याची पॉकेट घड्याळ आहे. जी टायटॅनिकवर प्रवास करत असलेला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जॉन जॅकब एस्टोरची होती. नुकतीच ही घड्याळ लिलावात विकण्यात आली. यावेळी या घड्याळाची 150,000 पाउंट म्हणजे साधारण 1.5 कोटी रूपये किंमत ठेवण्यात आली होती. पण एका व्यक्तीने ही घड्याळ 900,000 पाउंड देऊन खरेदी केली. भारतीय करन्सीमध्ये ही किंमत 9.5 कोटी रूपये इतकी होती. याआधी टायटॅनिकवरील एका व्हायोलिनचा लिलाव करण्यात आला होता. याला 1.1 मिलियन पाउंड किंमत मिळाली होती.
14 एप्रिल 1912 च्या रात्री टायटॅनिक जहाज हे साउथेम्प्टनहून न्यूयॉर्ककडे रवाना झालं होतं. त्यावेळी या जहाजाची एका हिमखंडाशी टक्कर झाली. 1500 पेक्षा जास्त लोकांना त्यावेळी जलसमाधी मिळाली होती. नंतर या जहाजाचे अवशेष शोधण्यात आले. तेव्हा 280 पेक्षा अधिक वस्तू काढण्यात आल्या होत्या. ज्या यादगार बनल्या. यासाठी बरेच लोक मोठी किंमत देतात.
47 वर्षीय मिस्टर एस्टोरही टायटॅनिकवर आपल्या पत्नीसोबत होते. घटनेवेळी ते पत्नीला लाइफबोटमध्ये बसवण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही पॉकेट घड्याळ त्यांच्याजवळ होती. लंकाशायरचे वालेस हार्टले त्या बॅंडचं नेतृत्व करत होते जेव्हा घटनेवेळी बॅंड वाजवत होते.