गुगल अर्थ एक्सप्लोरर (Google Earth Explorer) म्हणजे गुगल मॅप (Google Map) वर नवनव्या ठिकाणांचा शोध घेणारी जोलीन वुल्तागिओ (Joleen Vultaggio) काही दिवसांपासून सोशल मीडियावर(Social Media) चर्चेत आहे. तिने शोधादरम्यान एक नवं बेट(Island) शोधून काढलंय. ज्याचा आकार सर्वांना अचंबित करणारा आहे. आता तिने सोशल मीडियावर अनेक गोष्टींचे फोटो शेअर केलेत. पण तिच्या या शोधाला (Manhood Shaped Island) पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
या महासागरात मिळालं बेट
५० वर्षीय जोलीन वुल्तागिओ (Joleen Vultaggio) नेहमीप्रमाणे ऑनलाइन वर्ल्ड मॅपवर(World Map) वर नवीन ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच तिची नजर एक अजब बेटावरवर पडली. हे बेट प्रशांत महासागरात आहे. आणि या बेटाचा शेप मेल प्रायव्हेट पार्टसारखा(Male Private Part) दिसत होता. तिने या पेनिसच्या आकाराच्या बेटाचे फोटो लगेच सोशल मीडियावर शेअर केले.
पहिल्यांदाच दिसलं असं बेट
जोलीनने ज्या बेटाचा शोध लावला आहे. ते बेट ५०० मीटर लांब आहे. आतापर्यंत मिळालेल्या लोकेशनच्या आधारावर हे बेट फ्रान्समध्ये(France) न्यू कॅलेडोनिया (New Caledonia) जवळ ट्रॉपिकल ट्रिनिटी आयलॅंड (Tropical Trinity Island) च्या बाजूला आहे. जोलीननुसार, तिने आजपर्यंत असं बेट पाहिलं नाही.
मॅपवर पिन केलं लोकेशन
जोलीनचं सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यावर समजलं की तिने आतापर्यंत अनेक अनोळखी ठिकाणांचा शोध घेतला आहे. तिला वाटतं अशा शोधांसाठी अनेकदा लोक तिच्यावर हसतात सुद्धा. त्यामुळे यावेळी तिची नजर या विचित्र आकाराच्या बेटावर पडली तर तिने लगेच लोकेशन पिन केलं. जेणेकरून लोक तिच्यावर शंका घेणार नाही.