एक, दोन नाही त्याने 14 वेळा जिंकली लॉटरी, वैतागून कंपनीला बदलावा लागला नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:00 PM2018-08-31T15:00:01+5:302018-08-31T15:00:55+5:30
लॉटरी लागावी, आपण रातोरात मालामाल व्हावे, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी वेळोवेळी लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल 14 वेळा लॉटरी लागली.
बुखारेस्ट - लॉटरी लागावी, आपण रातोरात मालामाल व्हावे, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी वेळोवेळी लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल 14 वेळा लॉटरी लागली. त्याला नेहमी लागत असलेल्या लॉटरीमुळे चकीत झालेल्या लॉटरी कंपनीला वैतागून अखेरीस आपला नियमच बदलावा लागला.
कमाल म्हणजे गणिततज्ज्ञ असलेल्या स्टीफन मंडेल याने कोणताही दगाफटका न करता एवढ्या लॉटरी जिंकल्या आहेत. नोकरी करता करता अधिकची कमाई करण्यासाठी मंडेल यांनी लॉटरीचे तिकीट काढण्यास सुरुवात केली होती. रोमानियामध्ये जन्मलेले आणि आता ऑस्ट्रेलियन नागरिक असलेले मंडेल यांनी आपल्या गणितातील ज्ञानाचा उपयोग करून लॉटरी जिंकण्याचा फॉर्म्युला शोधून काढला होता. त्यामुळे ते एकापाठोपाठ एक लॉटरी जिंकत होते. अखेरीस मंडेल यांना रोखण्यासाठी लॉटरी कंपन्यांना आपले नियमच बदलावे लागले.
रोमानियामध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहणाऱ्या मंडेल यांनी पाच अंकांच्या फॉर्म्युल्यामधून सहावा क्रमांक अचूक शोधण्यास सुरुवात केली होती. रोमानियात लॉटरी जिंकल्यानंतर ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. तिथेही त्यांनी मोठ्या जॅकपॉटवर नजर ठेवून लॉटरीचे तिकिट खऱेदी केले. तिथेही त्यांनी 12 लॉटरी जिंकल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी नियम अधिक कठोर केले. तसेच एका व्यक्तीला लॉटरीची तिकिटे खरेदी करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले. ऑस्ट्रेलियामध्ये लॉटरी जिंकणे कठीण झाल्यावर मंडेल यांनी अमेरिकेत लक्ष केंद्रित केले. तिथे त्यांनी व्हर्जिनिया राज्यात सर्वात मोठा जॅकपॉट जिंकला. दरम्यान एका घोटाळ्या प्रकरणी त्यांना 20 महिन्यांचा कारावासही झालेला आहे.