बाबो! जेवढ्यात खरेदी केली पार्किंग स्पेस, तेवढ्यात आलिशान बंगला येईल ना भौ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:42 PM2019-10-26T12:42:22+5:302019-10-26T12:46:09+5:30
अलिकडे पार्किंग स्पॉटची किती परेशानी असते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ज्या व्यक्तीकडे बिल्डींगमध्ये पार्किंग स्पॉट असेल त्या व्यक्तीला एक वेगळीच प्रतिष्ठा असते.
(Image Credit : driving-tests.org)
अलिकडे पार्किंग स्पॉटची किती परेशानी असते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ज्या व्यक्तीकडे बिल्डींगमध्ये पार्किंग स्पॉट असेल त्या व्यक्तीला एक वेगळीच प्रतिष्ठा असते. या पार्किंग स्पॉटच्या किंमतीही अव्वाच्या सव्वा असतात. पण पार्किंग स्पॉटची एक किंमत समोर आली असून ही किंमत वाचून तुम्ही चक्रावून जाल. हॉंगकॉंगमध्ये एका पार्किंग स्पॉट तब्बल ६.९ कोटी रूपयांचा विकला गेला आहे.
हा पार्किंग स्पॉट जगातला सर्वात महागडा पार्किंग स्पॉट झाला आहे. रिपोर्टनुसार, हा पार्किंग स्पॉट लॉजिस्टिक बिझनेसमन Johnny Cheung चा होता. त्यांचं ऑफिसही बाजूच्याच बिल्डींगमध्ये होतं.
किती जागा आहे
मीडिया रिपोर्टनुसार, या पार्किंग स्पॉटची आकार १३५ स्क्वेअर फूट इतका आहे. ज्या व्यक्तीने हा पार्किंग स्पॉट खरेदी केलाय. त्या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. हॉंगकॉंगमध्ये जमीन फारच कमी आहे. त्यामुळे इथे प्रॉपर्टी रेट चार पटीने वाढला आहे.
हॉंगकॉंगमध्ये गेल्यावर्षी एक पार्किंग स्पॉट ५ कोटी रूपयांना विकला गेला होता. रिपोर्ट्नुसार, १५० वर्ग फूट पार्किंग ५,०८,७८,२०० रूपयांना विकली गेली होती. त्यासोबतच २०१७ मध्ये इथेच १८८ स्क्वेअर फूटाचं पार्किंग साधारण ४ कोटी रूपयांना विकलं गेलं होतं.