अबब! इथे कार पार्किंगपेक्षाही लहान आहेत नॅनो फ्लॅट्स, किंमत मात्र कोटींच्या घरात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 12:49 PM2019-01-26T12:49:32+5:302019-01-26T12:52:47+5:30
हॉंगकॉंग जगभरात आपल्या महागड्या घरांसाठी प्रसिद्ध आहे. महागाईची अशी स्थिती आहे की, इथे घरांचे आकार दिवसेंदिवस लहान होत आहेत.
हॉंगकॉंग जगभरात आपल्या महागड्या घरांसाठी प्रसिद्ध आहे. महागाईची अशी स्थिती आहे की, इथे घरांचे आकार दिवसेंदिवस लहान होत आहेत. आता तर स्थिती नॅनो प्लॅट्सपर्यंत येऊन पोहोचली आहे. यावरूनचा येथील एक प्रॉपर्टी डेव्हलपर चर्चेत आहे. त्याने काही अपार्टमेंट तयार केले आहेत. यातील घरांचा आकार कार पार्किंग पेक्षाही लहान आहे. खासियत म्हणजे इतके लहान प्लॅट्स असूनही या नॅनो फ्लॅट्सची किंमत करोडोंमध्ये आहे.
१२८ स्क्वेअर फूटचा प्लॅट
एक स्थानिक प्रॉप्रटी डेव्हलपरने टी प्लसची सुरूवात केली आहे. याला ते शू बॉक्स प्लॅट्सही म्हणतात. हा प्लॅट १२८ स्क्वेअर फूटाचा आहे. तर हॉंगकॉंगमध्ये कार पार्किंगसाठी सरासरी १३० स्क्वेअर फूट जागा मिळते. म्हणजे या प्लॅटची जागा त्याहीपेक्षा कमी आहे. पण मजेदार बाब ही आहे की, टी प्लस अपार्टमेंटमध्ये अनेक सुविधा आहेत.
या अपार्टमेंटमध्ये किचनसोबतच, टॉयलेट, स्टोरेज स्पेस, रेफ्रिजरेटरसाठी जागा, एक बेड आणि डायनिंग टेबलसाठीही जागा आहे. या प्लॅटच्या आकाराचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, पाच पावले चालून घर संपतं.
किती आहेत फ्लॅट्स आणि किती आहे किंमत?
टी प्लस मायक्रो फ्लॅट्स विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरून प्रेरित आहेत. टी प्लस अपार्टमेंटमध्ये एकूण ७३ फ्लॅट्स आहेत. महत्त्वाची बाब म्हणजेय यातील अनेक फ्लॅट्स विकले गेले आहेत. या एका फ्लॅटची किंमत ३६४, ६०० डॉलक इतकी आहे. म्हणजे भारतीय मुद्रेत ही रक्कम २.५९ कोटी इतकी होते. हॉंगकॉंगमध्ये गेल्यावर्षी २०९ स्क्वेअर फूटाचा फ्लॅट १ मिलियन डॉलरला विकला गेला होता.