नदीच्या मधोमध एका दगडावर बांधलं आहे हे खास घर, पर्यटकांची असते मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:10 AM2024-04-13T11:10:32+5:302024-04-13T11:13:30+5:30
एका वाहत्या मोठ्या नदीच्या मधोमध एका मोठ्या दगडावरील घर. हे घर सर्बियामध्ये आहे. चला जाणून घेऊ या घराची कहाणी....
काही लोकांना एकटं शांत ठिकाणी राहणं आवडतं. अशा ठिकाणी जिथे लोकांची गर्दी नसणार, फक्त निसर्गाची साथ असेल. अशा ठिकाणांच्या शोधात लोक जंगलांमध्ये किंवा डोंगरांवर जातात. असंच एक ठिकाण फार चर्चेत असतं. पण हे ठिकाण असतं खास आहे की, कुणीही त्याच्या प्रेमात पडेल. एका वाहत्या मोठ्या नदीच्या मधोमध एका मोठ्या दगडावरील घर. हे घर सर्बियामध्ये आहे. चला जाणून घेऊ या घराची कहाणी....
काही वेबसाइट्सच्या रिपोर्टनुसार, सर्बियातील ड्रीना नदीतील एका विशाल दगडावर असलेलं हे घर जगापासून दूर आहे. हे अनोखं घर 50 वर्षाआधी तयार करण्यात आलं होतं. नॅशनल जियोग्राफिकवर या घराचा फोटो दाखवण्यात आल्यापासून हे घर चर्चेत आलं आणि इथे पर्यटकही येऊ लागलं. हे घर बॅजिना बास्ता नावाच्या एका वस्तीजवळ वाहणाऱ्या नदीत बनलं आहे. हे टारा नॅशनल पार्कच्या जवळ आहे.
एका विशाल दगडावर बनलेलं हे घर 50 वर्षापासून वेगवेगळ्या वातावरणाचा सामना करत आहे. अनेकदा त्याची पडझड झाली. पण ते पुन्हा बनवण्यात आलं. 1968 मध्ये हे घर बांधण्यात आलं होतं. नदीत पोहायला येणाऱ्या एका ग्रुपला अशा ठिकाणाचा शोध होता जिथे त्यांना स्वीमिंग दरम्यान आराम करायला मिळावा. अशात त्यांनी या दगडावर एख घर बांधलं. नावेने ते घरात जात होते.
हंगरीचे फोटोग्राफर इरीन बेकर या फोटो काढला. तेव्हा लोकांना या घराच्या सुंदरतेची जाणीव झाली. आजही बरेच लोक इथे येतात आणि या घरात वेळ घालवतात. आज हे घर एक फेमस टूरिस्ट डेस्टिनेशन झालं आहे.