लघवीचा रंग पिवळा कसा होतो? अनेक वर्षांपासून वैज्ञानिक शोत होते उत्तर, आता समजलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:41 AM2024-01-08T10:41:40+5:302024-01-08T10:42:12+5:30

वैज्ञानिक या गोष्टीचा शोध अनेक वर्षापासून घेत होते, पण नेमकी प्रक्रिया आणि कारण त्यांना समजत नव्हतं.

How does urine turn yellow? Scientists have been wondering the answer for many years, now we know the reason... | लघवीचा रंग पिवळा कसा होतो? अनेक वर्षांपासून वैज्ञानिक शोत होते उत्तर, आता समजलं कारण...

लघवीचा रंग पिवळा कसा होतो? अनेक वर्षांपासून वैज्ञानिक शोत होते उत्तर, आता समजलं कारण...

वैज्ञानिकांनी अखेर या गोष्टी शोध लावला की, यूरिन म्हणजे लघवीचा रंग पिवळ कसा होतो. याबाबत अनेक रिसर्च केले गेले आणि वेगवेगळे निष्कर्षही काढण्यात आले. पण हे रहस्य पूर्णपणे उलगडण्याचा दावा एका नव्या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. वैज्ञानिक या गोष्टीचा शोध अनेक वर्षापासून घेत होते, पण नेमकी प्रक्रिया आणि कारण त्यांना समजत नव्हतं.

नेचर मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये मेरीलॅंड युनिव्हर्सिटीच्या सेल बायोलॉजी अॅंन्ड मॉलीक्यूलर जेनेटिक्सचे असिस्टंट प्रोफेसर ब्रैंटले हॉल आणि त्यांच्या टीमने याची नेमकी प्रक्रिया शोधून काढली आहे की, लघवीचा रंग पिवळा का होतो. तसेच त्यांनी हेही शोधून काढलं की, हे रहस्य उलगडण्यासाठी इतका वेळ का लागला.

मनुष्यामधून नैसर्गिकपणे निघणाऱ्या पदार्थात लघवी शेवटची आहे. यात भरपूर पाणी आणि किडनी व रक्तातील फिल्टर कचरा असतो. यात खासकरून लाल रक्तपेशी म्हणजे रेड सेल्स असतात जे मृत असतात. हेच सेल्स हीमोग्लोबिनच्या माध्यमातून रक्तात ऑक्सिजन ने-आण करण्याचं काम करतात.

याच लाल पेशी हीम नावाचा एक पदार्थ बनवतात. जेव्हा लाल पेशी नष्ट होतात तेव्हा त्यांच्यातील हीम मुळे अशा घटनांची सुरूवात होते ज्यामुळे लघवी पिवळी होते. वैज्ञानिक हे आधीच माहीत होतं की, यूरबिलिन नावाचं एक रसायन लघवीच्या पिवळेपणासाठी जबाबदार असतं. पण याची प्रक्रिया पूर्णपणे ते समजू शकले नव्हते की, असं कसं होतं.

या रिसर्चमध्ये हॉल यांनी पोटातील बॅक्टेरियाची भूमिका सांगितली आणि हीमपासून तयार इतर पदार्थ तोडून सांगितलं की, लघवी अखेर पिवळी कशी होते. सहा महिन्यांच्या जीवनानंतर लाल रक्तपेशी नष्ट होतात त्यातून एक पदार्थ बनतो ज्याला बिलिरूबिन म्हणतात. पोटातील सूक्ष्मी जीव बिलिरूबिनला अशा अणुमध्ये बदलतात जे ऑक्सिजनमुळे पिवळ्या रंगाचे होतात. याच अणुला यूरोबिलन म्हणतात.

वैज्ञानिकांनी या रिसर्चसाठी जबाबदार एंझाइमची ओळखही पटवली आहे. ज्याला त्यांनी बिलिरूबिन रेड्यूक्टेज किंवा बिएलआर म्हटलं आहे. यातून पोटाच्या मोठ्या आतडीमध्ये यूरोपिलिनोजन बनवलं जातं. 

वैज्ञानिकांनी सांगितलं की, पोटातील सूक्ष्मजीवांचं अध्ययन करणं फारच अवघड काम होतं. म्हणून हे रहस्य उलगडण्यात इतका वेळ लागला. तेच पोटात असे खूपसारे एंझाइम विना ऑक्सिजनचे वाढतात. त्यामुळे प्रयोग शाळेत ते बनवनं अवघड होतं.

Web Title: How does urine turn yellow? Scientists have been wondering the answer for many years, now we know the reason...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.