'कुत्ते मै तेरा खून पी जाऊंगा', 'कुत्र्यासारखी हालत झालीये' अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण कुत्र्यांशी जोडून बघतो. पण या सर्वात एक गोष्ट सर्वात खास असते ती म्हणजे कुत्रे माणसापेक्षाही इमानदार असतात. त्यामुळे कुत्रे कितीतरी घरातील सदस्य असतात. पण कुत्रा आणि माणसाचा असाच एक वेगळा प्रकार समोर आला आहे. इंग्लंडच्या ग्रेटर मॅनचेस्टरमध्ये राहणारा ३७ वर्षीय Kaz James स्वत:ला 'ह्यूमन पप' समजतो. म्हणजे तो त्याचं जीवन एका माणसाप्रमाणे नाही तर एका कुत्र्याप्रमाणे जगतो. ह्यूमन पप हे एकप्रकारचे Fetish असतात, ज्यांना कुत्र्यासारखं जगणं पसंत असतं.
प्रत्येक काम कुत्र्यासारखं
खरंतर ही गोष्टी तुम्हाला फार विनोदी किंवा विचित्र वाटत असेल पण Kaz त्याच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट कुत्र्यासारखी करतो. तो प्लेटमध्ये नाही तर डॉग बाउलमध्ये जेवण करतो. तो त्याच्या मित्रांना चाटतो, चावतो आणि त्यांच्यावर भुंकतो सुद्धा. हे आपल्याला ऐकायला विचित्र वाटत असलं तरी जेम्ससाठी हे सवयीचं झालं आहे.
स्वत:ला समजतो 'ह्यूमन पप'
जेम्स त्याच्या या रूपाबाबत सांगतो की, 'मी स्वत:कडे कधीच माणसाप्रमाणे नाही तर एका कुत्र्याप्रमाणे पाहिलं. माझ्या मित्रांना हे माहीत आहे की, मी जेव्हा त्यांना हॅलो म्हणतो तेव्हा त्यांच्या शर्टची कॉलर दातांमध्ये पकडतो. त्यांना चावतो आणि नंतर चाटतो. कदाचित मी नेहमीपासूनच असा आहे'.
१७व्या वर्षी आलं 'हे' समोर
जेम्सला तो ह्यूमन पप असल्याचं तेव्हा कळालं जेव्हा त्याला घरात इंटरनेटची सुविधा मिळाली. जेम्स हा १७ वर्षांचा होता, तेव्हा त्याने त्याचेसारखे ह्युमन पप असलेल्या लोकांसोबत ऑनलाइन बोलणं सुरू केलं. आता त्याचं एकच लक्ष्य आहे की, स्वत:ला पूर्णपणे कुत्र्यासारखं करणं. याच कारणाने तो आता कुत्र्यासारखा दिसण्यासाठी कपडेही तसेच वापरतो. १ लाखापेक्षा खर्च करून त्याने हे कपडे तयार करून घेतले. तसेच तो गळ्यात पट्टाही घालतो आणि भुंकतो सुद्धा.
त्याने सांगितले की, 'मला आठवतं की माझं वागणं बालपणापासूनच कुत्र्यासारखं होतं. कदाचित ६व्या वर्षांपासून. पण कधी मला याबाबत काही सांगितलं नाही'.