दोन अनोख्या पिस्तुलांचा लिलाव; ६ कोटी रूपये असेल सुरूवातीची किंमत, पण इतकी किंमत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 04:27 PM2019-07-10T16:27:02+5:302019-07-10T16:35:04+5:30
पिस्तुलांची किंमत किती असेल? असा प्रश्न विचारला जर सगळेजण केवळ अंदाज बांधणे सुरू करतील.
पिस्तुलांची किंमत किती असेल? असा प्रश्न विचारला जर सगळेजण केवळ अंदाज बांधणे सुरू करतील. कारण पिस्तुल किंवा कोणत्याही शस्त्राची नेमकी किंमत फार कुणाला माहीत नसते. पण अमेरिकेतील डलासमध्ये लिलाव होणाऱ्या दोन पिस्तुलांची किंमत १० कोटी रूपये लावण्यात येऊ शकते. तुम्ही म्हणाला इतकी का? तर या पिस्तुल सामान्य नाहीत. त्यांची एक खासियत आहे.
या वेगळ्या दोन्ही पिस्तुली ४५०० कोटी वर्ष जुन्या उल्का पिंडापासून तयार करण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांनुसार, म्योनियोनॉलुस्टा पृथ्वीवर पडणाऱ्या सर्वात पहिल्या उल्का पिंडांपैकी एक आहे. त्यामुळे या पिस्तुलींना वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या पिस्तुलांचा लिलाव २० जुलैला अमेरिकेतील हेरिटेज ऑक्शन हाऊसकडून केलं जाणार आहे.
म्योनियोनॉलुस्टा उल्कापिंड स्वीडनमध्ये १९०६ मध्ये शोधण्यात आली होती. या उल्का पिंडाचा वापर करून पिस्तुली तयार करण्यात आल्यात. लिलावाची तयारी पूर्ण झाली असून या पिस्तुलांची सुरवातीची किंमत ६ कोटी रूपये ठेवण्यात आली आहे.
(Image Credit : wikipedia.org)
लिलाव करणाऱ्या संस्थेचे निर्देशक क्रॅग किसिक यांच्यानुसार, या पिस्तुलांचा जास्तीत जास्त भाग हा उल्का पिंडापासून तयार करण्यात आला आहे. या पिस्तुलांची खासियत लिहिताना वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे की, १९११ च्या प्रसिद्ध कोल्ट पिस्टलपासून प्रेरित होऊन या पिस्तुली तयार करण्यात आल्या आहेत.
(Image Credit : wikipedia.org)
या पिस्तुल तयार करणारे लोई बियोन्दू यांच्यानुसार, पिस्तुली तयार करण्याचा अनुभव वेगळा होता. या तयार करताना असं वाटत होतं की, कार्बन स्टील, अॅल्युमिनिअम आणि स्टीलमध्ये हिरे मिश्रित करत आहे.