अबबब! या भारतीय व्यक्तीला मिळालं १७,५०० कोटी रूपयांचं पॅकेज, हैराण झाले जगभरातील सीईओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 12:41 PM2021-12-18T12:41:26+5:302021-12-18T12:42:24+5:30
जगदीप सिंह (Jagdeep Singh) यांच्या पॅकेजबाबत जाणून घेतल्यावर जगभरातील दिग्गज कंपन्यांचे सीईओ हैराण आहेत. जगदीप सिंहने स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक केलं.
भारतीय वंशाचे अनेक लोक परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ आहेत. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल काही दिवसांपूर्वी चर्चेत होते. आता पुन्हा एक भारतीय चर्चेत आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या व्यक्तीला बॅटरी बनवणाऱ्या एका स्पार्टअप कंपनीने वार्षिक १७,५०० कोटी रूपयांचं पॅकेज दिलं आहे. या व्यक्तीचं ना जगदीप सिंह (Jagdeep Singh) आहे. ते त्यांच्या पगारामुळे चर्चेत आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचं पॅकेज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलन मस्कला टक्कर देतं.
जगदीप सिंह यांच्या पॅकेजबाबत जाणून घेतल्यावर जगभरातील दिग्गज कंपन्यांचे सीईओ हैराण आहेत. जगदीप सिंहने स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक केलं. त्यासोबत यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातून एमबीए आणि University of Maryland College कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं QuantumScape Corp कंपनीकडून त्यांना हे पॅकेज देण्यात आलं आहे.
भारतीय वंशाचे जगदीप सिंह अमेरिकन स्टार्टअप कंपनी QuantumScape Corp चे सीईओ बनले आहेत. कंपनीने त्यांना १७, ५०० कोटी रूपयांचं मोठं पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. एक वर्षाआधी ही कंपनी जगासमोर आलली. कंपनीच्या शेअरहोल्डर्सच्या वार्षिक बैठकीत जगदीप सिंह यांना इतकं पॅकेज देण्याला मंजूरी देण्यात आली.
आधीही अनेक कंपन्यांचे होते सीईओ
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जगदीप सिंह QuantumScape Corp कंपनी के फाउंडरही आहेत. ते आधी २००१ ते २००९ पर्यंत Infinera चे सीईओ होते. २००१ आधी ते lightera Networks, AirSoft सारख्या कंपन्यांचे फाऊंडर आणि सीईओ होते. त्यांनी २०१० साली QuantumScape Corp कंपनी सुरू केली होती.
५० अब्ज डॉलरची कंपनीची व्हॅल्यू
जगदीप सिंहच्या कंपनीत वॉक्सवॅगन आणि बिल गेट्सच्या वेंचरने फंड गुंतवले आहेत. कंपनीची व्हॅल्यू आता ५० अब्ज डॉलरची आहे. ही कंपनी पुढच्या पीढीच्या टेक्नीकवर फोकस करत आहे. जगदीप सिंह यांची कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणारी कंपनी लीथियम-आयन बॅटरीला सुरक्षित आणि स्वस्त पर्याय देण्यावर फोकस करत आहे.