बाप रे बाप! जगातलं सर्वात महागडं चॉकलेट भारतात केलं तयार, किंमत वाचून डोळे फिरतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 03:29 PM2019-10-24T15:29:07+5:302019-10-24T15:42:32+5:30

सामान्यपणे लोकांना १०० ते २०० रूपयांचं चॉकलेट फार महागडं वाटतं. अशात जर कुणी तुम्हाला कुणी सांगितलं तर की, जगात असंही चॉकलेट आहे, ज्याची किंमत लाखांमध्ये आहे तर...?

ITC launches worlds most expensive Chocolate Fabelle trinity truffles extraordinaire | बाप रे बाप! जगातलं सर्वात महागडं चॉकलेट भारतात केलं तयार, किंमत वाचून डोळे फिरतील!

बाप रे बाप! जगातलं सर्वात महागडं चॉकलेट भारतात केलं तयार, किंमत वाचून डोळे फिरतील!

Next

सामान्यपणे लोकांना १०० ते २०० रूपयांचं चॉकलेट फार महागडं वाटतं. अशात जर कुणी तुम्हाला कुणी सांगितलं तर की, जगात असंही चॉकलेट आहे, ज्याची किंमत लाखांमध्ये आहे तर...? अर्थातच कुणालाही धक्का बसेल. पण हे अजिबात सत्य नाहीये. भारतातील प्रसिद्ध कंपनी आयटीसीने जगातलं सर्वात महागडं चॉकलेट तयार केलं आहे.

या चॉकलेटचं नाव 'ट्रिनिटी - ट्रफल्स एक्सट्राऑर्डिनेअर' असं आहे. या चॉकलेटची प्रति किलो किंमत तब्बल ४.३ लाख रूपये इतकी आहे. सर्वात महागडं चॉकलेट असल्याने या चॉकलेटचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

जगातलं हे सर्वात महागडं चॉकलेट तीन व्हेरिएंटमध्ये तयार करण्यात असून पहिल्या व्हेरिएंटमध्ये व्हॅनीला बीन्ससोबत टोस्टेड कोकोनट गॅनेस आहेत. तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये घाना डार्क चॉकलेट आणि जमैका ब्लू माउंटेन कॉफीचं मिश्रण आहे. तसेच तिसऱ्या व्हेरिएंटमध्ये एक्सट्रीम वेस्टमधून मिळालेलं डॉमिनिक डार्क चॉकलेट आहे.

हे चॉकलेट फ्रान्सचे प्रसिद्ध शेफ फिलिप फिलिप कॉन्टिसिनी आणि फॅबेल चॉकलेटिअरने मिळून तयार केलं आहे. फिलिप हे सध्या पेस्ट्री ऑफ ड्रीम्सचे सह-संस्थापक आणि तेथील मुख्य पेस्ट्री शेफ आहेत.

हाताने तयार केलेल्या लाकडाच्या बॉक्समध्ये या चॉकलेटची विक्री केली जाणार आहे. या बॉक्समध्ये १५ ट्रफल्स असतील आणि प्रत्येकाचं वजन १५ ग्रॅम इतकं असेल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, चॉकलेटच्या या बॉक्सचीच किंमत तब्बल एक लाख रूपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: ITC launches worlds most expensive Chocolate Fabelle trinity truffles extraordinaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.