नुकताच 400 कोटीच्या लग्नामुळे फेमस झाला होता नवरदेव, आता तुरूंगात जाईल आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 04:24 PM2023-12-07T16:24:01+5:302023-12-07T16:26:54+5:30

एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याबाबत त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दोषी आढळल्यानंतर त्याला त्याचं पुढचं जीवन तुरूंगात घालवावं लागेल. 

Jacob Lagrone the viral groom popular for his Paris wedding of the century going to be face life sentence | नुकताच 400 कोटीच्या लग्नामुळे फेमस झाला होता नवरदेव, आता तुरूंगात जाईल आयुष्य

नुकताच 400 कोटीच्या लग्नामुळे फेमस झाला होता नवरदेव, आता तुरूंगात जाईल आयुष्य

शतकातील सगळ्यात महागडं लग्न करणारं कपल मेडलेन ब्रॉकवे आणि जेकब लाग्रोन यांना कुणाची तरी नजर लागली आहे. कारण जॅकबला लवकरच जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याबाबत त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दोषी आढळल्यानंतर त्याला त्याचं पुढचं जीवन तुरूंगात घालवावं लागेल. 

मेडलेन आणि जॅकब यांनी या शतकातील सगळ्यात महागडं लग्न केलं. त्यांच्या लग्नाची चर्चा जगभरात झाली. पॅरिसच्या एका आलिशान महालात त्यांचं लग्न झालं आणि त्याचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले. पाहुण्यांना नेण्यासाठी प्रायव्हेट जेटचा वापर करण्यात आला होता. या लग्नाला अजून महिनाही पूर्ण झाली नाही. अशात नवरदेवाविरोधात एक गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मेडलेनचा परिवार टेक्सासमधील प्रसिद्ध कार डीलर आहे. रातोरात आपल्या लग्नामुळे ती फेमस झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलेल्या या लग्नाच्या नवरीने आता तिचं इन्स्टा आणि टिकटॉक प्रायव्हेट केलं आहे. मेडलेनचा पती 29 वर्षीय जॅकबवर पोलीस अधिकाऱ्यावर गोळी चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 14 मार्चला 3 पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण आणि एका अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याच्या गुन्ह्यात त्याच्या विरोधात कारवाई केली जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, काही तक्रारीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर जॅकबने गोळी झाडली. टेक्सासमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यावर गोळी झाडणं एक प्रथम श्रेणी गुन्हा आहे. जॅकबवर लागलेल्या आरोपांनुसार, त्याने मुद्दामहून अधिकाऱ्यांना धमकावलं आणि त्यांच्यावर हत्याराने हल्ला केला. 

30 नोव्हेंबरला फोर्ट वर्थमध्ये टॅरेंट कोर्ट हाऊसमध्ये जॅकबला हजर करण्यात आलं होतं. दोषी आढळल्यावर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्याची पत्नी मॅडलेन या कारवाईमध्ये सहभागी झाली नव्हती. मेडलेन बॉब ब्रोकवेची मुलगी आहे, जो पूर्ण फ्लोरिडामध्ये मर्सिडीज बेंझच्या डीलरशिपचा मालक आहे. या लग्नासाठी जवळपास 400 कोटी रूपये खर्च करण्यात आला होता.

Web Title: Jacob Lagrone the viral groom popular for his Paris wedding of the century going to be face life sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.