हा आहे अमेरिकेतील सर्वात महागड्या घराचा मालक, घराची किंमत वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:26 PM2019-01-25T17:26:57+5:302019-01-25T17:28:17+5:30
जगातल्या महगाड्या घरांची किंमत नेहमीच चिंतेत असते. भारतात तर मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलिया घराची चर्चा असते.
जगातल्या महगाड्या घरांची किंमत नेहमीच चिंतेत असते. भारतात तर मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलिया घराची चर्चा असते. कारण हे घर जगातलं दुसरं सर्वात महाग घर आहे. पण अमेरिकेतील सर्वात महाग घर किती रूपयांचं असेल याचा विचार केला का? एका उद्योगपतीने अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये एक अपार्टमेंट खरेदी करून सर्वांनाच धक्का दिला आहे. या अपार्टमेंटची किंमत २३८ मिलियन डॉलर(१६९० कोटी रूपये) आहे. हे अमेरिकेत विकलं गेलेलं सर्वात महागडं घर झालं आहे.
कुणी घेतलं हे घर?
हे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव केन ग्रिफिन असं आहे. केन अरबपती असून हेग फंड इन्व्हेस्टमेंट कंपनी सिटाडेलचे संस्थापक आहेत. हे त्यांनी विकत घेतलेलं चार मजली घर २२० सेंट्रल पार्क साउथमध्ये आहे. हा परिसर अमेरिकेतील सर्वात पॉश आणि महागडा परिसर मानला जातो.
याआधीची महागडी घरे
सेंट्रल पार्क येथे असलेल्या या घराआधी अमेरिकेत २०१४ मध्ये एक घर १३७ मिलियन डॉलर(९७३ कोटी रूपये) ला विकलं गेलं होतं. चीनच्या एका हॉटेल मॅनेजमेंट कंपनीचे मालक टॉग-टॉग जाओ ने एका इमारतीच्या २७ व्या मजल्यावर १३.५ मिलियन डॉलर(९६ कोटी रूपये)ला खरेदी केलं होतं.
केन ग्रिफिनच्या नावे अनेक महागडी घरे
५० वर्षीय केन लंडनमध्ये बकिंघम पॅलेसजवळ घर खरेदी करून चर्चेत आले होते. हे घर त्यांनी १२४ मिलियन डॉलर (८८० कोटी रूपये) ला खरेदी केले होते. बकिंघम पॅलेस हे जगातलं सर्वात महागडं घर आहे. हा महल इंग्लंडच्या राजघराण्याचा आहे.
केन यांनी पहिल्यांदाच महागडं घर खरेदी केलं नाहीये. त्यांच्या नावावर याआधीही अनेक महागडी घरे आहेत. मिआमीमध्ये त्यांच्याकडे सर्वात महागडं घर आहे. हे घर त्यांनी २०१५ मध्ये ६० मिलियन डॉलरला खरेदी केलं होतं. तसेच गेल्यावर्षी त्यांनी शिकागोमध्ये ५९ मिलियन डॉलरला एक घर खरेदी केली. शिकागोमध्ये त्यांच्याकडे तीन घरे आहेत. फ्लोरिडामध्ये सहा तर हवाईमध्ये त्यांची दोन घरे आहेत.