अनेकांचे झाडांवर फार प्रेम असते. कोणाला झाडं लावण्याची आवड असते. अनेकजण आपल्या घराच्या बाल्कनीत, इमारतीच्या गच्चीवर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतात. मातीशिवाय उगवण्यात आलेल्या ऑर्गेनिक झाडांची उदाहरणं तुम्हाला अनेक घरांमध्ये सापडतील. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका झाडप्रेमी असलेल्या व्यक्तीने आल्या घराच्या छतावर १, २ नाही तर तब्बल ४० प्रकारची आंब्याची झाडं लावली आहेत. या माणसाचे नाव जोसेफ फ्रासिस आहे. एर्णाकुलममध्ये हा व्यक्ती वास्तव्यास आहे.
६२ वर्षीय जोसेफ हे एसी टेक्निशीयन आहेत. पण सुरूवातीपासूनच त्यांच्या कुटुंबीयांकडून शेती केली जायची. त्यांचे आजोबा हे मोठे शेतकरी होते. जोसेफ यांना शेतीची खूप आवड आहे. पण घर चालवण्यासाठी आणि हातात पुरेसे पैसै असावेत यासाठी ते एसी टेक्निशियनचे काम करतात. आपल्या शेतात त्यांनी गुलाब, मशरूम इत्यादी पीकं लावली आहेत.
जोसेफ यांनी बेटर इंडीयाशी बोलताना सांगितले की, फोर्ट कोच्चीमधील माझ्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब होते. माझ्या मामांनी देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून ही गुलाबाची झाडं आणली होती. कोच्चीमध्ये गुलाबाच्या प्रजाती शेतात होत्या. त्यामुळे जोसेफ यांनी आपल्या घराच्या छतावर कुडींत गुलाब आणि मशरुम लावायला सुरूवात केली. कालांतराने त्यांनी आंब्याची लागवड सुद्धा केली. बघता बघता ४० प्रकारच्या आंब्याची लागवड त्यांनी केली.
त्यांनी हापूस, नीलम, माल्गोवो अशा वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडं लावली आहेत. त्यातील काही झाडं वर्षातून २ वेळा फळं देतात. जोसेफ यांनी आंब्याची वेगळी प्रजात विकसित केली असून त्याला आपल्या पत्नीचे नाव दिले आहे. याशिवाय आपल्या छतावर टॉमेटो, काकडी गाजर इत्यादी भाज्या उगवतात.
CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...
'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती