एका महिलेच्या शरीरातून डॉक्टरांनी घटनेच्या तब्बल 30 तासांनंतर एक चाकू काढला. 3 तासांच्या सर्जनीनंतर डॉक्टरांनी हा चाकू बाहेर काढला. ही घटना तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील होसुर येथे घडली. महिलेचं नाव मल्लिका असून तिचं वय 40 सांगण्यात आलं आहे.
मल्लिकावर 25 मे रोजी हल्लेखोरांनी हल्ला केला होता. तिच्या शरीरात चाकू मारण्यात आला होता. पण तिला याची अजिबात कल्पना नव्हती की, संपूर्ण रात्र चाकू तिच्या छातीत राहिल्यावर ती वाचेल की नाही. घटनेच्या 24 तासांनंतर कोयम्बटूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या डॉक्टरांना 3 तासांच्या सर्जरीनंतर महिलेच्या शरीरातून चाकू काढण्यात यश मिळालं.
सर्जरीच्या 3 दिवसांनंतर महिलेला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. मल्लिकाला आधी सलेमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तेथून कोयम्बटूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले होते.
हा चाकू 6 इंचापेक्षा अधिक लांबीचा होता. महिलेच्या फुप्फुसाच्या छोट्या भागात चाकूमुळे छिद्र पडलंय. सुदैवाने महिलेच्या हृदयाला काहीही इजा झाली नाही. डॉ. श्रीनिवासन आणि एनेस्थिसियोलॉजचे प्रमुख डॉ. जयशंकर नारायणन यांच्या नेतृत्वात ही सर्जरी केली गेली.
बोंबला! थेट पोलिसांसमोरच त्याने गॅस पास केला; अन् मग पोलिसांंनी 'असा' वसूल केला दंड
बाबो! तरूणीने एका बुक्कीत फोडली हवेतील विमानाच्या खिडकीची काच, इतर प्रवाशी 'कोमात'...