ट्रेनमध्ये वाजवले जातात ११ प्रकारचे वेगवेगळे हॉर्न, प्रत्येक हॉर्नला असतो वेगळा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:50 PM2019-06-06T15:50:09+5:302019-06-06T15:57:08+5:30

तसे तर आपण सर्वजण बालपणापासून ट्रेनच्या हॉर्नची नक्कल करत आलो आहोत. पण अनेकांना हे माहीत नाही की, ट्रेनच्या हॉर्न केवळ हॉर्न नसून त्याला एक अर्थही असतो.

Know about 11 horn of Indian train | ट्रेनमध्ये वाजवले जातात ११ प्रकारचे वेगवेगळे हॉर्न, प्रत्येक हॉर्नला असतो वेगळा अर्थ!

ट्रेनमध्ये वाजवले जातात ११ प्रकारचे वेगवेगळे हॉर्न, प्रत्येक हॉर्नला असतो वेगळा अर्थ!

Next

तसे तर आपण सर्वजण बालपणापासून ट्रेनच्या हॉर्नची नक्कल करत आलो आहोत. पण अनेकांना हे माहीत नाही की, ट्रेनच्या हॉर्न केवळ हॉर्न नसून त्याला एक अर्थही असतो. सोबतच तुम्हाला हे वाचूनही आश्चर्य वाटेल की, भारतीय रेल्वेमध्ये ११ प्रकारच्या हॉर्नचा वापर केला जातो आणि या प्रत्येक हॉर्नला एक अर्थ असतो. चला जाणून घेऊन भारतीय रेल्वेत वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या हॉर्नबाबत आणि त्याचा वापर चालक कशाप्रकारे करतात. 

जर चालकाने एकदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, ट्रेन यार्डमध्ये जाण्यासाठी तयार आहे. तसेच जर चालकाने दोनदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, चालक गार्डला ट्रेन सुरू करण्याचा संकेत मागत आहे.

जर ट्रेन चालवताना चालकाने तीन वेळा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, ट्रेन नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि याने गार्डला संकेत दिला जातो की, त्याने त्याच्या डब्यातील व्हॅक्यूम ब्रेकचा वापर लगेच करावा. त्यासोबतच जर ट्रेन सुरू असताना अचानक थांबली आणि अशात चालकाने चारवेळा छोटा हॉर्न वाजवला तर समजून घ्या की, इंजिनमध्ये बिघाड आहे आणि गाडी पुढे जाऊ शकणार नाही किंवा काही दुर्घटना झाली आहे. 

जर चालकाने एकदा मोठा हॉर्न आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याने गार्डला संकेत दिला जातो की, एकदा गाडी सुरू होण्यापूर्वी त्याने ब्रेक पाइप सिस्टीमची तपासणी करावी. तसेच जर चालकाने दोन मोठे आणि दोन छोटे हॉर्न वाजवले तर याचा अर्थ होतो की, गार्डने इंजिनकडे यावं.

जर चालकाने पुन्हा पुन्हा मोठा वाजवला तर याचा अर्थ होतो की, गाडी कोणत्याही स्टेशनवर न थांबता पुढे जाणार आहे. त्यासोबतच जर चालकाने थांबून थांबून मोठा हॉर्न वाजवला जर याचा अर्थ होतो की, गाडी रेल्वे फाटकाला क्रॉस करत आहे. असं करून रस्त्यावरील लोकांना दूर राहण्याचा संकेत दिला जातो.

(Image Credit : Postoast)

जर चालकाने एक मोठा आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, रेल्वे विभागली जात आहे. त्यासोबतच चालकाने दोन छोटे आणि एक मोठा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, कुणीतरी आपातकालीन चेन ओढली आहे किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला असेल. तसेच जरक चालकाने ६ वेळा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, पुढे काहीतरी मोठा धोका आहे.

Web Title: Know about 11 horn of Indian train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.