भारतात काय किंवा परदेशात काय सगळ्यांच्याच घरात चम्मच असतात. किचनमध्ये चमच्याशिवाय काम भागतच नाही. पण आपल्या रोजच्या जीवनातील महत्वाचा भाग असणाऱ्या चमच्या तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की, चमच्याचा आविष्कार सगळ्यात आधी कुठे झाला होता? कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल आणि असा प्रश्नही पडला नसेल. पण आज याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, चमच्याचा वापर सगळ्यात आधी कुठे झाला होता.
घरातील किचन असो वा हॉटेलमधील किचन इथे चमच्याशिवाय काम भागत नाही. किचनमध्ये यांचा वापर बघून असं वाटतं कित्येक वर्षापासून चम्मच आपल्या जीवनाचा भाग आहे. पण जेव्हा आपण याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा फारच रोमांचक कहाणी समोर येते.
एसीसिल्वरच्या रिपोर्टनुसार, पुरातत्ववाद्यांच्या शोधांमधून समोर आलं आहे की, पहिला चम्मच 1 हजार इसवी सन पूर्वमध्ये तयार झाला होता. त्यावेळी याचा वापर मुख्यपणे सजावट किंवा धार्मिक कामांसाठी केला जात होता.
आधी कुठं बनले चमचे
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, प्राचीन इजिप्तमधील लोक सगळ्यात आधी लाकडाच्या, दगडाच्या आणि हस्तीदंताच्या चमच्यांचा वापर करत होते. हे चम्मच फार सुंदर आणि प्रभावशाली असायचे. हे खासकरून सजावटीसाठी वापरले जात होते. कारण वाट्यांवरही धार्मिक दृश्य कोरलेले असायचे. पण नंतर ग्रीक आणि रोमन साम्राज्यांदरम्यान चमचे कास्य आणि चांदीचे बनवले गेले होते. हे महागड्या धातुंपासून तयार केले होते म्हणून जास्तकरून श्रीमंत लोक यांचा वापर करायचे.
सोन्या-चांदीचे चमचे
यूरोपमध्ये मध्ययुगीन काळाच्या सुरूवातीला शिंग, लाकूड, पितळ यांपासून चमचे तयार केले जात होते. हे बनवण्यात फार सोपे होते आणि फार सुंदरही दिसत होते. इंग्रजांच्या इतिहासात चमच्यांचा पहिला उल्लेख 1259 मध्ये एडवर्ड प्रथमच्या काळात आढळतो. त्यावेळी चमचे कपाटात ठेवण्याबाबत बोललं जात होतं. तेच 15 व्या शतकात लाकडी चमच्यांची जागा धातुच्या चमच्यांनी घेणं सुरू केलं होतं.