वाईनच्या बॉटलखाली खड्डा का असतो? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:12 PM2024-04-13T13:12:01+5:302024-04-13T13:12:17+5:30
तुम्ही कधी विचार केलाय का की, इतर बॉटलसारख्या वाईनच्या बॉटल खालून चपट्या का नसतात? जाणून घेऊ याचं कारण...
दारूच्या बॉटल्स वेगवेगळ्या डिझाइनमध्ये असतात. भलेही त्यातील दारू आरोग्यासाठी नुकसानकारक असली तरी बॉटल्स फारच आकर्षक असतात. रम किंवा वोडकाच्या बॉटल्स फार वेगळ्या डिझाइनच्या असतात. जेव्हा वाईनच्या बॉटलचा विषय येतो तेव्हा त्याच्या खास शेपची चर्चा होते. कारण वाईनच्या बॉटलचा जो शेप असतो तो इतर बॉटल्ससारखा प्लेन नाहीतर तिथे खड्डा असतो. तुम्ही कधी विचार केलाय का की, इतर बॉटलसारख्या वाईनच्या बॉटल खालून चपट्या का नसतात? जाणून घेऊ याचं कारण...
मेंटल फ्लॉस वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, वाईनच्या बॉटलखाली असलेल्या खड्डयाला पंट असं म्हणतात. इंडस्ट्रियल रेवोल्यूशनआधी सगळ्या काचेच्या बॉटल्स हाताने बनवल्या जात होत्या. त्यावेळी बॉटल बनवणारे लोक हे पंट वेगळं बनवत होते. जेणेकरून बॉटल सरळ उभी रहावी. आजच्या काळात सगळ्या काचेच्या बॉटल मशीनमध्ये बनवल्या जातात. त्यामुळे आजकाल काही बॉटल्सचा खालचा भाग चापट असते. पण 200 वर्षाआधी असं करणं शक्य नव्हतं.
खालच्या भागात खड्डा असण्याचं कारण...
फार आधी बॉटल्सचं हेच डिझाइन चलनात होतं. याच कारणाने मेकर्स हे क्लासिक डिझाइन बदलत नव्हते. मुळात हा खड्डा पकडून लोक वाईन सर्व करतात. एक्सपर्ट्स सांगतात की, जेव्हा वाईन एखाद्या ग्लासमध्ये टाकली जाते तेव्हा टाकणारी व्यक्ती अंगठा त्या खड्ड्यात ठेवते.
खड्ड्याची आणखी कारणे
वाईनच्या बॉटलच्या खालचे खड्डे जेवढे खोल असतात त्यात वाईन तेवढी कमी असते. अशाप्रकारे ग्राहकांना अनेकदा फसवलंही जातं. पंट असण्याची काही कारणे असतात. पण काही कारणे लोकांकडून बनवण्यात आले आहेत. ज्यामागे काही ठोस पुरावे नाहीत. जसे की, खोल खड्डा असेल तर वाईनची बॉटल लवकर थंड होते किंवा खड्डा असल्याने बॉटलच्या आत सेडिमेंट, ग्लासमध्ये पडत नाही. त्याशिवाय अनेक लोकांचं मत असतं की, खड्डा असेल तर बॉटल जास्त प्रेशर पेलू शकते.