कानपूर – कोरोना महामारीला रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेकांची लग्न खोळंबली आहेत. काही लग्न पुढे ढकलण्यात आली आहे तर काहींनी लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याचा वेगळा फंडा शोधून काढला आहे. ४ मे रोजी असणारं लग्न लॉकडाऊनमुळे १७ मे रोजी ढकलण्यात आलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित केल्याने पुन्हा पंचाईत झाली.
लग्न पुढे ढकलत असल्याचं पाहत वधूने मोठा निर्णय घेतला. कानपूरच्या देहात मंगलपूर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय गोल्डीने सलग १२ तास पायपीट करत भावी नवऱ्याच्या गावी पोहचली. नवऱ्याच्या कुटुंबाने अचानक नवरीला बघितल्याने आश्चर्यचकीत झाले. नवऱ्याच्या कुटुंबाने तिचे स्वागत करून तिच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने नवऱ्याच्या गावातील मंदिरात दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत गावकऱ्यांनीही लग्नाला हजेरी लावली. गोल्डीने सांगितले की, ४ मे रोजी आमचं लग्न होणार होतं. पण लॉकडाऊनमुळे ते टळलं. त्यानंतर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याची वाट पाहिली. मात्र त्यानंतही लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलं. नवरीच्या कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला पण नवरीने कोणालाही न सांगता घर सोडून थेट नवऱ्याचं घर गाठलं.
गोल्डीने ८० किमी प्रवास सलग १२ तास पायपीट करुन केला त्यानंतर ती नवऱ्याच्या गावात पोहचली. १२ तासाच्या प्रवासात तिने काहीही खाल्लं नाही. तिच्यासोबत एक छोटी बॅग होती. ज्यात काही कपडे होते. नवऱ्याच्या गावात पोहचल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने गावातील मंदिरात गोल्डी आणि विरेंद्रकुमार राठोड यांचे लग्न लावण्यात आले. मास्क घालून लग्न करणाऱ्या जोडप्याचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सुमारे ३ कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर लीक
कोरोना लसीच्या चाचणीत भारताला मोठी आशा; लहान मुलं अन् वृद्धांवर होणार प्रयोग!
भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!
कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज
विहिरीतून काढले तब्बल ९ मृतदेह; एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश, परिसरात खळबळ