बाबो! घरासमोरचं गवत न कापल्याने 'या' व्यक्तीला २० लाखांचा दंड, प्रकरण कोर्टात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 01:23 PM2019-05-22T13:23:59+5:302019-05-22T13:29:12+5:30
तापत्या उन्हात अंगणातील गवत कापत बसण्याची कुणाची बरं इच्छा होईल? कुणी याचा विचारही करणार नाही.
(प्रातिनिधीक छायाचित्र) (Image Credit : Laurelhurst Blog)
तापत्या उन्हात अंगणातील गवत कापत बसण्याची कुणाची बरं इच्छा होईल? कुणी याचा विचारही करणार नाही. पण असं करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. एका व्यक्तीला घरासमोरील लॉनमधील गवत वाढल्याने आणि ते न कापल्याने त्याला तब्बल २० लाख रूपयांचां दंड ठोठावला आहे.
जिम फिकन ही व्यक्ती अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. त्यांच्या लॉनमधील गवत १० इंचापेक्षा अधिक वाढलं होतं. त्यामुळे त्यांना ३० हजार अमेरिकन डॉलर इतका दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम २०, ९०, ७९६ रूपये इतकी होते.
शहर प्रशासनाकडून हा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फिकन शहरात नव्हते. त्यांच्या आईची तब्येत खराब होती. त्यामुळे ते घरी नव्हते. त्यांनी ही माहिती घरासमोर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ला सांगितले की, हा दंड फार जास्त आहे.
फिकन यांनी सांगितले की, त्यांनी गवत कापण्यासाठी एका व्यक्तीला कामावर ठेवलं होतं. पण अचानक त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांची गवत कापण्याची मशीन तुटलेली होती. इतक्यात मला नोटीस आली. २० लाख रूपये दंड भरा.
फिकन सांगतात की, त्यांच्यांकडे दंड भरण्यासाठी इतकी रक्कम नाहीये. स्थानिक प्रशासनाचं यावर म्हणणं आहे की, फिकन यांना याआधी अनेकदा नोटीस पाठिवली होती. पण फिकन यांच्याकडून काहीच उत्तर मिळालं नाही. आता स्थिती अशी आहे की, त्यांचं घरही त्यांच्या हातून जाऊ शकतं. सध्या हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. फिकनच्या वकिलांनी लॉनमधील गवत का कापलं गेलं नाही, याची वेगवेगळी कारणे सांगितले आहेत. त्यामुळे आता कोर्ट यावर काय निकाल देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.