वाह रे वाह! गर्लफ्रेन्डने लग्नास होकार द्यावा म्हणून तिच्या घरासमोरच बॉयफ्रेन्ड बसला उपोषणाला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 01:20 PM2019-06-05T13:20:05+5:302019-06-05T13:27:20+5:30

'शोले' सिनेमात वीरू बसंतीने लग्नाला होकार द्यावा म्हणून पाण्याच्या टाकीवर चढतो आणि लग्नाला होकार दिला नाही तर उडी घेऊन जीव देईन अशी धमकी देतो.

Man goes on hunger strike to convince girlfriend to marry him | वाह रे वाह! गर्लफ्रेन्डने लग्नास होकार द्यावा म्हणून तिच्या घरासमोरच बॉयफ्रेन्ड बसला उपोषणाला आणि....

वाह रे वाह! गर्लफ्रेन्डने लग्नास होकार द्यावा म्हणून तिच्या घरासमोरच बॉयफ्रेन्ड बसला उपोषणाला आणि....

Next

(Image Credit : justnewsly.com)

'शोले' सिनेमात वीरू बसंतीने लग्नाला होकार द्यावा म्हणून पाण्याच्या टाकीवर चढतो आणि लग्नाला होकार दिला नाही तर उडी घेऊन जीव देईन अशी धमकी देतो. त्यानंतर काय होतं हे सर्वांनाच माहीत आहे. एकप्रकारे वीरूने धरणे धरले होते. धरणे-आंदोलन हे तुमचं मत मांडण्यासाठी आणि तुमचा आवाज एखाद्या गोष्टी विरोधात उठवण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. अनेकजण आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करतात, उपोषणाला बसतात. पण सोडून गेलेली प्रेयसी परत मिळवण्यासाठी कुणी उपोषणाला बसल्याचं तुम्ही कधी ऐकलं नसेल. 

पश्चिम बंगालमध्ये अशीच एक अनोखी घटना घडली आहे. अनंत बर्मन नावाचा तरूण लिपिका नावाच्या मुलीच्या प्रेमात होता. गेल्या ८ वर्षांपासून दोघात प्रेमात प्रेमाचं नातं होतं. पण अचानकपणे लिपिकाने अनंतशी संपर्क करणं बंद केलं, तिने त्याला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं, त्याला नंबर ब्लॉक केला. या घटनेने अनंत चांगलाच बिथरला.

पण अनंतने हार मानली नाही. आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी त्याने इकडून तिकडून काही माहिती काढली आणि त्याच्या लक्षात आलं की, लिपिकाच्या घरचे लोक तिच्यासाठी मुलगा शोधत आहेत. त्याला हे कळताच अजिबात वेळ न घालवता प्रेयसीला परत मिळण्याची कल्पना सुचली. ज्या दिवशी लिपिकाला बघण्यासाठी मुलगा येणार होता, त्याच दिवशी अनंतने तिच्या घरासमोर धरणे धरले. 

अनंतच्या हातात एक बोर्डही होता, ज्यावर लिहिलं होतं की, 'मला माझी ८ वर्षे परत कर'. अशात काही लोक अनंतच्या सपोर्टमध्ये तिथे आलेत. त्यानंतर अनंतच्या घरातील लोकही तिथे जमले. इतकेच काय तर पोलिसही काही वेळाने घटनास्थळी पोहोचले. पण पोलिसही अनंतला रोखू शकले नाहीत.  

अनंतने काहीच खाल्लं नसल्याने त्याची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अनंतच्या या उपोषणाचा फायदा झाला. स्थानिक नागरिकांनी लिपिकाची आणि तिच्या परिवाराची समजूत काढली आणि त्यानंतर लिपिका अनंतसोबत लग्नासाठी तयार झाली. लिपिकाच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिचा होकार अनंतला कळवला. काही दिवसातच अनंत आणि लिपिकाचं लग्न झालं. 

Web Title: Man goes on hunger strike to convince girlfriend to marry him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.